ये मेरी फॅमिलीचा तिसरा सीझन 4 एप्रिल 2024 पासून केवळ अॅमेझॉन मिनीटीव्हीवर पाहायला मिळणार
मुंबई, 29 मार्च, 2024 – अॅमेझॉन मिनीटीव्ही – अॅमेझॉन शॉपिंग अॅपवरील अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा, प्लेस्टोअर आणि फायर टीव्हीवर आज टीव्हीएफच्या ये मेरी फॅमिली शोच्या तिसऱ्या सीझनचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 1995 च्या काळात घडणाऱ्या या तिसऱ्या सीझनमध्ये अवस्थी परिवाराच्या माध्यमातून टिपिकल भारतीय घरातलं वातावरण अनुभवता येणार आहे. तिसरा सीझन प्रेक्षकांना रिषी (अंगद राज) नावाच्या 11 वर्षांच्या, मोठी स्वप्नं पाहाणाऱ्या आणि तितकंच मोठं मन असणाऱ्या खट्याळ मुलाच्या नजरेतून घडणाऱ्या या सीझनमध्ये जुही परमार, राजेश कुमार आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अवस्थी परिवार आयुष्याच्या गुंतागुंतीतून मार्ग काढत असताना हा ट्रेलर 90 च्या दशकात घेऊन जाईल. जुने सोनेरी दिवस, कधी न तुटणारी घट्ट मैत्री आणि विनोद, जुन्या आठवणी, ऊबदार नाती यांनी विणलेला प्रत्येक यात पाहायला मिळतो. घड्याळ्याच्या कर्कश आवाजानं उठणं आणि भावंडांबरोबर मस्ती करणं ही तेव्हा सगळ्यात मोठी चैन होती. या ट्रेलरमध्ये सोपा, आदर्श काळ एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये रिषी आणि रितिकाची गमतीदार बडबड आणि त्यांच्या आई- वडिलांची कटकट याचं मजेशीर मिश्रण पाहायला मिळतं. वास्तविक प्रसंग आणि भावनांवर लक्ष केंद्रित करणारा ये मेरी फॅमिलीचा हा ट्रेलर कडूगोड (“कुछ खट्टी-कुछ मीठी”) आठवणींना उजाळा देणारा आहे.
नीरजाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या जुही परमार यांनी या सीरीजबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, ‘आजकाल प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या भावना आणि व्यक्तीरेखा पाहायच्या असतात. ये मेरी फॅमिली हा शो वेगवेगळ्या भावना मांडणारा आहे. 90 च्या दशकाचा नॉस्टॅल्जिया दाखवणाऱ्या या शोमधील भावना आणि परिस्थिती आपण सर्वांनीच अनुभवलेली आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेऊन तिसऱ्या सीझनची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या सीझनचा दृष्टीकोन आधीच्या सीझनपेक्षा वेगळा असेल, कारण तो कुटुंबातल्या सर्वात लहान – 10 वर्षाच्या सदस्याने कथन केलेला आहे. आम्हाला आशा आहे, की हा शो तयार करताना आम्हाला जितकी मजा आली, तितकीच ती प्रेक्षकांना पाहाताना येईल.’
“ये मेरी फॅमिलीचे पुनरागमन होत असल्याची घोषणा करताना आम्ही थरारून गेलो आहोत. या शोमध्ये 90 च्या दशकाचा नॉस्टॅल्जिया परत एकदा मांडण्यात आला आहे. शोच्या पहिल्या व दुसऱ्या सीझनला मिळालेला लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेऊन या सीझनमध्ये आम्ही पावसाळ्याची मजा मांडली आहे, जी प्रेक्षकांना जुन्या दिवसांची आठवण करून देईल. यानिमित्ताने टीव्हीएफचा तेरावा शो तिसऱ्या सीझनपर्यंत पोहोचला असून ये मेरी फॅमिली या पुढेही प्रेक्षकांना आपलासा वाटत राहील. आम्हीही सातत्याने काळाच्या कसोटीवर खरे उतरणारे मनोरंजन प्रेक्षकांना मिळवून देण्याची बांधिलकी जपणार आहोत,’ असे टीव्हीएफचे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले.
ये मेरी फॅमिलीच्या या बहुप्रतीक्षीत सीझनचे प्रीमियर एप्रिल 2024 दिवशी अॅमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत होणार आहे. अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्लेस्टोअर आणि फायर टीव्हीवर बटनाच्या एका क्लिकवरून या शोचा आनंद घेता येणार आहे.


