Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरिता निवड चाचण्यांचे सोमवारपासून नागपूर येथे आयोजन*

शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरिता निवड चाचण्यांचे सोमवारपासून नागपूर येथे आयोजन*

पुणे, दि.१४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व शिवछत्रपती क्रीडा पेठ पुणे अंतर्गत राज्यात ८ क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून सन २०२६-२७ करता प्रवेशासाठी निवड चाचणींचे सोमवार ते बुधवार दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

खेळाडूंनी हँडबॉल खेळासाठी सरळ प्रवेश प्रक्रिया अर्जंट आहे १७ व ऑगस्ट १८ ऑगस्ट व १८ व १९ ऑगस्ट जीरोजी खेळण्यात कौशल्य चाचणी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर कोराडी रोड नागपूर येथे सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे.

चाचणीकरिता येणा-या खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था वैयक्तीक स्तरावर स्वतः करावयाची आहे. संबंधित स्पर्धेचे प्राविण्य, सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा उदा. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर अनुषंगिक सर्व कागदपत्रे व सुयोग्य स्पोर्टस् किट सह चाचणी स्थळी उपस्थित रहावे. चाचणी प्रकार- सरळ प्रवेश करिता राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. खेळनिहाय कौशल्य चाचणीकरिता किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. खेळाडू १९ वर्षाआतील असावा. अधिक माहितीसाठी श
भुषण इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक हॅन्डबॉल (मोबा. क्र.७४४७६५४८९) यांच्याशी संपर्क साधावा.

क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत निवड होणा-या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अर्हताधारक खेळाडूंनी चाचण्यांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments