Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवरायांचा इतिहास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा -पतित पावन संघटनेची मागणी ;...

शिवरायांचा इतिहास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा -पतित पावन संघटनेची मागणी ; सीबीएसई बोर्डाचे रिजनल ऑफिसर राम वीर यांना निवेदन

पुणे : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये देखील शिकविला जाणे गरजेचे आहे. सीबीएससी बोर्डाच्या २७ हजारहून अधिक मान्यता प्राप्त शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु सीबीएसई बोर्डाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा विसर पडला आहे, याकरिता पतित पावन संघटनेतर्फे सीबीएसई बोर्डाचे रिजनल ऑफिसर राम वीर यांना निवेदन देण्यात आले.

सीबीएसई बोर्ड पुणे विभागीय कार्यालय येथे निवेदन देण्याच्या प्रसंगी संघटनेचे पुणे शहराचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, शैक्षणिक विभाग समन्वयक ध्रुव जगताप, पुणे शहराचे उपाध्यक्ष प्रसाद वाईकर आदी उपस्थित होते. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीतून आज परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याकरिता संघटनेने हे निवेदन दिले आहे.

स्वप्नील नाईक म्हणाले, शिवरायांच्या ऐतिहासिक वारसा देशातल्या नवीन पिढीला अभ्यासता यावा, राष्ट्रीय स्वाभिमान व अस्मिता जागरूक व्हावी, याकरिता हे निवेदन देण्यात आले. ज्या वयात विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण होते, त्या काळात विद्यार्थ्यांना जगाच्या पटलावर अधिराज्य केलेले अभ्यासू, धुरंदर, युगपुरुष, लढवय्ये, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळावा अशा प्रेरणादायी युगपुरुष राजाचा इतिहास हा सीबीएसई च्या अभ्यासक्रमामध्ये असणे गरजेचे आहे. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने माणसाची जडणघडण होते त्याच राजाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments