Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे मनपातील कचरा अर्थकारण आणि राजकारण

पुणे मनपातील कचरा अर्थकारण आणि राजकारण

पुणे -पुणे मनपातील कचरा अर्थकारण आणि राजकारण यांविषयी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांचे लक्ष वेधले आहे.या पत्रात म्हटले आहे की,
सन्माननीय स्थायी समिती यांनी भूमी ग्रीन यांना कचरा प्रकल्प करण्यासाठी दिला, आपल्या विषय पत्राप्रमाणे.
टेंडर पिरियड हा पाच वर्षाचा असावा कारण जास्त काळाचा दिला तर त्यात महानगरपालिकेचे नुकसान होते.
खात्याने आपली कशी फसवणूक केली आहे हे आपल्या निदर्शनास आणीत आहे.
१) टेंडर मध्ये भूमी ग्रीन यांनी 942 असा रेट दिला होता.
२) त्यावर खूप चर्चा झाली आणि हा रेट आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असे अतिरिक्त आयुक्त आणि खाते प्रमुखांनी जाहीर केले.
३) मग तडजोडीमध्ये 772 हा रेट दिला.
४) खाते प्रमुखापासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सर्वांनी आपली पाठ थोपटून घेतली आणि महानगरपालिकेचे पैसे वाचवले असा आभास निर्माण केला.
५) 942 रुपये असताना त्यांना दरवाढ ही पाच टक्क्याने दिली होती म्हणजे करार संपेपर्यंत आपण त्यांना 568 कोटी पंचेचाळीस लाख 33 हजार 500 इतकी रक्कम देणार होतो एकदा खात्री करून बघा.
६) पाठ थोपटून घेतल्यानंतर 772 हा दर निश्चित केल्यानंतर त्यांना दरवाढ ही सात टक्के दिली.
७) म्हणजे त्यांना अकरा कोटी रुपये जास्त देणे
577 कोटी 58 लाख 54 हजार 913 रुपये ही रक्कम करार समताना होणार.
८) हा करार संपेल तेव्हा तुम्ही रिटायर्ड झालेले असाल खाते प्रमुख रिटायर्ड असतील अतिरिक्त आयुक्त कदाचित सेवेत असतील कारण ते तरुण आहेत.
९) पुणेकर वेडी आहेत का ?
१०) पुणेकर जागरूक नाहीत का ?
११) अतिरिक्त आयुक्त आणि खाते प्रमुख तुम्हाला फसवतात का ?
साहेब पाच वर्षाचा टेंडर काढा आणि हे सर्व रद्द करा पुणेकर कुणाला बांधील नाहीत आमच्या पैशाचा अपव्य आम्हाला चालणार नाही.
आम्ही जंग पुकारला आहे.
प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून आहोत.
पुण्याला लुटू देणार नाही.
स्थायी समितीने केलेला ठराव आणि आपण मानलेला प्रस्ताव पुण्याच्या हिताचा नाही पुण्याला लुटणारा आहे आम्ही राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून 451 कलमाद्वारे स्थगिती मागणार आहोत दर राज्य सरकारने स्थगिती दिली नाही तर हायकोर्टामध्ये जाण्याचा आमचा हक्क राखून ठेवून आपणास विनंती आहे की हा प्रस्ताव आणि हा ठराव याची अंमलबजावणी न करता पाच वर्षासाठी टेंडर काढावे.
साहेब यातले अनेक बारकावे आम्ही पुढच्या पत्रामध्ये आपल्याला देणार आहोत ट्रकचे वजन वजन काटे बाहेर जाऊन पुन्हा नंबर प्लेट बदलून आलेले तेच ट्रक याचे तपशील आपणास देणार आहोत.
आपणास पुन्हा एकदा विनंती की हे विषय पत्र मागे घेऊन स्थायी समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करू नये आणि पुणेकरार आणि आपणास फसवणारा जो कोणी असेल त्याच्यावर कार्यवाही करावी. या निवेदनाच्या प्रती
माननीय मुख्यमंत्री
माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री
माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री
माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ
खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री
माननीय उच्च शिक्षण मंत्री
माननीय नगर विकास राज्यमंत्री
माननीय महापौर
माननीय सभागृह नेते
माननीय विरोधी पक्षनेते यांना पाठविण्यात आल्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments