Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष वृत्त* *‘महा वॉकेथॉन’ मध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा- विभागाचे अधीक्षक...

विशेष वृत्त* *‘महा वॉकेथॉन’ मध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा- विभागाचे अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी*

पुणे, दि. १७: पुणे प्रादेशिक विभागात जलसंधारण दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड शिवाजीनगर पुणे, शाहू स्टेडियम सातारा, शंभर फुटी रोड सांगली, होम मैदान सोलापूर आणि वारणा भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे ‘महा वॉकेथॉनʼचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या पुणे प्रादेशिकचे अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत असून शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणे, पाणी बचत व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि जलसंधारणाच्या कार्यास व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देणे, या उद्देशाने राज्य शासनामार्फत जलसंधारण अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

२१ ऑगस्ट या दिवशी ‘माती वाचवा, पाणी जपा सुरक्षित भविष्य घडवाʼ या संकल्पनेवर आधारित ‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’चे राज्यभरात आयोजन करण्यात येणार आहे. या वॉकेथॉनला लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था व त्यांचे विद्यार्थी, सर्वच क्षेत्रातील युवा, नागरिक आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. जलसंधारण ही शासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जलसंधारणाबाबतची जाणीव भावी पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्युआर आधारित ऑनलाइन नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्याची तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. कलशेट्टी यांनी कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments