Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवार* *संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या...

प्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवार* *संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने धरणे आंदोलन*

*

पुणे :  प्रतिनिधी

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडात केवळ दलित म्हणून अत्यंत विद्वान, कर्तृत्ववान आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांचा केवळ दलित म्हणून करण्यात आलेला अपमान सहन करता कामा नये. सामाजिक समतेसाठी आणि प्रतिगामी शक्तींना विरोध करण्यासाठी पेटून उठण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने भारतीय संविधान आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उल्हास पवार यांच्यासह माजी आमदार जयदेव गायकवाड, कॉँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व विभाग) शहराध्यक्ष, आंदोलनाचे मुख्य समन्वयक कुणाल राजगुरू, माजी नगरसेविका लता राजगुरू,  विठ्ठल गायकवाड, शैलेंद्र मोरे, संग्राम रोहम, वसंत साळवे, रोहिदास गायकवाड, रवींद्र माळवदकर आदी सर्वपक्षीय नेते मंडळी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खर्गे यांना लहानपणापासून सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागले. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना जाळून मारण्यात आले. तरीही खचून न जाता खरगे यांनी मोठे कर्तृत्व गाजवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी, घटना, उद्दिष्ट आणि पार्श्वभूमी यावर प्रश्न उपस्थित करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. समाजासाठी उपयुक्त आणि क्रांतिकारक ठरतील असे अनेक निर्णय त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घेतले. ते विद्वान आहेत. बहुभाषिक आहेत. घटनात्मक पदावर आहेत. तरीही केवळ दलित म्हणून त्यांचा अवमान करणे कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा उल्हास पवार यांनी यावेळी दिला.

सध्याच्या काळात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरू शकतो. काँग्रेसने स्थापनेपासूनच सामाजिक समतेचा पुरस्कार केला आहे. काँग्रेसच्या दरवर्षीच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद आयोजित केली जात असे. या परिषदेत सामाजिक विषमता मोडून काढून समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विचार मंथन होत असे. स्वातंत्र्यानंतर स्पृश्यता निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले. काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे, असे मत जयदेव गायकवाड यांनी यावेळी मांडले. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना देशातील जनतेने डोक्यावर घेण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

विजय शंखनाथ रॅलीच्या कार्यक्रमासाठी उत्तराखंडमध्ये हलदानी येथील रामलीला मैदानावर मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर काही जातीयवादी शक्तींनी गोमूत्र शिंपडून रामलीला मैदान पवित्र केल्याचा दावा केला. या कृत्याचा निषेध करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments