नवी दिल्ली, एप्रिल १, २०२४: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रिमिअम कार्स उत्पादक कंपनीने एलीव्हेट, सिटी, सिटी ई:एचईव्ही आणि अमेझ या वेईकल्सचा समावेश असलेल्या लाइन-अपमध्ये अपग्रेडेड सुरक्षितता वैशिष्ट्यांची भर करत सुरक्षिततेप्रती कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. या सुधारणा २०५० पर्यंत जागतिक स्तरावर होंडा ऑटोमोबाइल्सचा समावेश असलेल्या रस्त्यावरील अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य करण्याप्रती कंपनीच्या जागतिक दृष्टिकोनाशी संलग्न आहेत.
लोकप्रिय मॉडेल्स होंडा एलीव्हेट व होंडा सिटी आता सहा एअरबॅग्ज, ३-पॉइण्ट एमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर (ईएलआर) सीटबेल्ट्स आणि सर्व श्रेणींमध्ये प्रमाणित ऑफरिंग म्हणून पाचही सीट्ससाठी सीटबेल्ट रिमाइंडर अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह सुसज्ज असतील. या मॉडेल्समध्ये विविध वैशिष्ट्यांची भर करण्यात येईल, जे ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करतील. सहा एअरबॅग्ज असलेली सिटी ई:एचईव्ही आता पाचही प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर्स वैशिष्ट्यासह येईल. होंडा अमेझमध्ये पाचही प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर्ससह सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये असतील.
अपग्रेडेड सेफ्टी पॅकेजबाबत मत व्यक्त करत होंडा कार्स इंडिया लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ताकुया त्सुमुरा म्हणाले, ”होंडा अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी वैशिष्ट्यांच्या सर्वसमावेशक श्रेणीच्या माध्यमातून ग्राहकांच्या सुरक्षिततेप्रती अविरत कटिबद्ध आहे, तसेच ड्रायव्हर्स, प्रवासी आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते. ‘होंडा वेईकल्सचा समावेश असलेल्या झीरो ट्रॅफिक कोलिजन फॅटिलिटीज’प्रती आमचे जागतिक धोरण आणि ‘सेफ्टी फॉर एव्हरीवन’ दृष्टिकोनासह आम्ही एलीव्हेट व सिटीमध्ये प्रमाणित ऑफरिंग म्हणून ६ एअरबॅग्जची भर करत आहोत. भारतातील रस्ते पायाभूत सुविधा विकसित होत असताना आणि ग्राहकांना सुरक्षिततेप्रती जागरूकतेचा प्रसार होत असताना होंडा सुरक्षिततेचा स्तर उंचावण्याप्रती कटिबद्ध आहे, ज्याद्वारे सर्वोत्तमता व ग्राहक समाधान देत आहे.”
संबंधित मॉडेल्स व श्रेणींमधील अपडेटेड वैशिष्ट्यांचा सारांश:
होंडा एलीव्हेट:
· सर्व श्रेणींमध्ये प्रमाणित उपयोजन म्हणून ६ एअरबॅग्ज (एसव्ही, व्ही आणि व्हीएक्समध्ये नवीन लाँच)
· श्रेणींमध्ये प्रमाणित म्हणून पाचही सीट्ससाठी अॅडजस्टेबल हेड रिस्ट्रेण्ट्ससह ३-पॉइण्ट एमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर सीटबेल्ट्स (सर्व श्रेणींमध्ये नवीन लाँच करण्यात आलेले रिअर सेंटर ३-पॉइण्ट सीटबेल्ट आणि हेड रिस्ट्रेण्ट)
· श्रेणींमध्ये प्रमाणित म्हणून पाचही सीट्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर (सर्व श्रेणीमध्ये नवीन लाँच करण्यात आलेले रिअर सीट बेल्ट रिमाइंडर)
· श्रेणींमध्ये प्रमाणित म्हणून ड्रायव्हर अँड असिस्टण्ट सनवायजर वॅनिटी मिररसह लिड (एसव्ही, व्ही, व्हीएक्समध्ये नवीन लाँच)
· श्रेणींमध्ये प्रमाणित म्हणून डिजिटल अॅनालॉग इंटीग्रेटेड मीटरसह १७.७ सेमी (७ इंच) एचडी फुल कलर टीएफटी एमआयडी (एसव्ही, व्हीमध्ये नवीन लाँच)
· व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्समध्ये सिल्व्हर पेंटसह फ्रण्ट एसी वेण्ट्स नॉब आणि फॅन / टेम्परेचर कंट्रोल नॉब
· Price in INR (Ex-Showroom Delhi):
ELEVATE
With reinforced safety features
SV
V
VX
ZX
1.5L i-VTEC MT
11,91,000
12,71,000
14,10,000
15,41,000
1.5L i-VTEC CVT
_
13,71,000
15,10,000
16,43,000
· -Additional price applicable on Pearl & Dual Tone Exterior Colours
होंडा सिटी:
· सर्व श्रेणींमध्ये प्रमाणित उपयोजन म्हणून ६ एअरबॅग्ज (एसव्ही आणि व्हीमध्ये नवीन लाँच)
· श्रेणींमध्ये प्रमाणित म्हणून पाचही सीट्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर (सर्व श्रेणीमध्ये नवीन लाँच करण्यात आलेले रिअर सीट बेल्ट रिमाइंडर)
· एसव्ही श्रेणीमध्ये नवीन लाँच करण्यात आलेले १०.६ सेमी (४.२ इंच) कलर टीएफटी मीटर डिस्प्ले
· व्हीएक्स श्रेणीमध्ये नवीन लाँच करण्यात आलेली ८ स्पीकर प्रिमिअम सराऊंड साऊंड सिस्टम
· व्हीएक्स श्रेणीमध्ये नवीन लाँच करण्यात आलेले रिअर सनशेड
होंडा सिटी ई:एचईव्ही:
· पाचही सीट्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर
Price in INR (Ex-Showroom Delhi):
CITY
With reinforced safety features
SV
V
VX
ZX
1.5L i-VTEC MT
12,08,100
12,85,000
13,92,000
15,10,000
1.5L i-VTEC CVT
_
14,10,000
15,17,000
16,35,000
e:HEV
_
_
_
20,55,100
-Additional price applicable on Pearl Exterior Colours
होंडा अमेझ:
· श्रेणींमध्ये प्रमाणित म्हणून पाचही सीट्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर (सर्व श्रेणींमध्ये नवीन लाँच करण्यात आलेले रिअर सीट बेल्ट रिमाइंडर)
· Price in INR (Ex-Showroom Delhi):
AMAZE
With reinforced safety features
S
VX
1.2L i-VTEC MT
7,92,800
9,04,000
1.2L i-VTEC CVT
8,82,600
9,86,000
-Additional price applicable on Pearl Exterior Colours
हे अपग्रेडेड मॉडेल्स देशभरातील सर्व अधिकृत होंडा डिलरशिप्समध्ये उपलब्ध असतील.


