मुंबई/पुणे, २५ ऑगस्ट २०२६: श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीने (एसएलआयसी) आर्थिक वर्ष २०२६ मध्ये महाराष्ट्रात आपल्या जीवन विमा व्यवसायात अतिशय दमदार कामगिरीची नोंद केली आहे. राज्यात जीवन विमा क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी साध्य केलेल्या वाढीपेक्षा एसएलआयसीने रिटेल प्रकारात अधिक पॉलिसीची विक्री केली आहे, तसेच रिटेल ग्राहकांकडून अधिक प्रमाणात प्रीमियम रक्कम संकलित करत खासगी कंपन्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविली आहे.
महाराष्ट्रात याच कालावधीत अन्य खासगी कंपन्यांनी रिटेल ग्राहकांना पॉलिसी विक्रीत १२ टक्के वाढ साध्य केली असताना एसएलआयसीने रिटेल पॉलिसी विक्रीत अतिशय घसघशीत अशी ३१ टक्के वाढ नोंदविली आहे. खासगी जीवन विमा कंपन्यांनी एकत्रितपणे ९ टक्के वाढ नोंदविली असताना कंपनीच्या प्रिमीयम संकलनात १७ टक्के वाढ झाली आहे.
श्रीराम लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅस्परस जे.एच. क्रोमहाउट (Casparus J.H. Kromhout) कंपनीच्या दमदार कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले, “महाराष्ट्र राज्य श्रीराम लाईफच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाची आर्थिक बाजारपेठ ठरली आहे. या भौगोलिक क्षेत्रात आमच्या प्रयत्नांना मिळत असलेले यश पाहून आम्हाला आनंद होत आहे. आम्ही महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत आणि हा वाढीचा वेग असाच सुरू राहील, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. कंपनीचा विस्तारणारा पाया, ग्राहकांचा विश्वास आणि या भागात विस्तारलेल्या वितरकांच्या जाळ्यामुळे पॉलिसी विक्री आणि प्रीमियम संकलनामध्ये आम्हाला मजबूत वाढ दिसून येत आहे.’’
महाराष्ट्रात अधिकाधिक व्यक्तींना जीवन विमा कवच उपलब्ध करुन देणे, ग्राहकांशी अधिकाधिक संवाद वाढविणे आणि व्यक्ती तसेच त्यांच्या कुटूबियांचे दीर्घकाळासाठी आर्थिक हित साधणे, यावर श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीचे लक्ष सदैव केंद्रीत झालेले आहे.
कंपनीने एजन्सी आणि बँकाशुरन्स या दोन पातळीवंर आपले वितरण जाळे अधिक मजबूत केले आहे. त्याचबरोबर डिजीटल पध्दतीने व्यवसायावरही भर दिला आहे आणि ग्राहक सेवेचा दर्जाही उंचावला आहे. संरक्षण आणि बचत या जीवन विमा योजनांआधारे जीवन विम्याच्या कवचात अधिकाधिक व्यक्तींना आणण्यासाठी कंपनीचे जोरदार प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे आगामी मध्यावधी कालावधीत रिटेल पॉलिसींची विक्री आणि रिटेल प्रिमीयम संकलन या दोन्ही पातळीवर कंपनीची वाढ टिकून राहणार आहे.
या विशेष प्रयत्नांमुळे श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीचे वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम संकलन आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २१ टक्क्याने वाढले आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये संकलित झालेली १,३७२ कोटी रुपयांची प्रीमियमरुपी रक्कम २०२६ मध्ये १,६६६ कोटी रुपयांवर झेपावली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये रिटेल समतुल्य वार्षिक प्रीमियम १४ टक्क्याने वाढले आहे. म्हणजेच समतुल्य वार्षिक प्रीमियम रक्कम आर्थिक वर्ष २०२५ मधील १,२८९ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,४७५ कोटी रुपयांवर पोहचली आहे.
श्रीराम लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२६ मध्ये महाराष्ट्रात दमदार वाढ: रिटेल पॉलिसीत ३१ टक्के, किरकोळ प्रीमियममध्ये १७ टक्के वृध्दी जीवन विमा क्षेत्रातील खासगी कंपन्यांच्या वृध्दीपेक्षा अधिक
RELATED ARTICLES


