पुणे – शहरात जागतिक दर्जाचे फुटपाथ करण्याची मागणी मनपातील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.याविषयीच्या पत्रात म्हटले आहे की
पुणे महानगरपालिकेमध्ये सात दिवसांमध्ये निविदा काढून स्पर्धा होऊन व अनुभवी निविदा प्राप्त होण्यास मदत होणार आहे असे खात्याने अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावात म्हंटले आहे.
१) पुणे शहर “खड्डाग्रस्त”आहे.
२) खड्डे बुजवण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयाला एका कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक केली आहे आणि त्यांना एक कोटीचे बजेट दिले आहे.
३) पावसाळ्यापूर्वी 5.2.2 खाली आपण फुटपाथची कामे पूर्ण केली निदान तसे दाखवले तरी आहे.
४) हे जागतिक दर्जाचे फुटपाथ कुठे करणार आहात
५) स्मार्ट सिटीच्या अंतर्गत
जंगली महाराज रोड झाला आहे
६) फर्ग्युसन रस्ता झाला आहे
७) कर्वे रोड झाला आहे
८) बाजीराव रोड व लक्ष्मी रोड झाला आहे
९) सेनापती बापट रोड
१०)लॉ कॉलेज रोड
११) विद्यापीठ रस्ता औंध रोड
१२) पाषाण रोड
१३) बाणेर रस्ता
१४) औंध आयटीआय रोड
१५) जुना पुणे मुंबई रस्ता,
१६) पंडित नेहरू रस्ता
१७) पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता – पुणे स्टेशन ते माल धक्का ते पॉवर हाऊस ते शंकरशेठ रोड ते मार्केट यार्ड मार्गे कात्रज कोंढवा रस्ता.
१८) बिबवेवाडी रस्ता,
१९) सहकारनगर परिसरातील रस्ते,
२०) शिवदर्शन परिसरातील रस्ते,
२१) सॅलसबरी पार्क परिसरातील रस्ते.
२२) हडपसर भागातील रस्ते,
२३) मुंढवा भागातील रस्ते,
२४) कोंढवा भागातील रस्ते
२५) शिवाजी रस्त्याला फार कमी प्रमाणात फुटपाथ आहे तो पण झाला आहे
२६) टिळक रोड
२७) लाल बहादूर शास्त्री रस्ता
२८) नगर रोड, सोलापूर रोड, स्वारगेट ते कात्रज, सिंहगड रोड, पुना स्टेशन परिसर, ढोले पाटील रोड परिसर, कोरेगाव पार्क परिसर अशा कुठल्या भागातील रस्त्यावरील फुटपाथ जागतिक दर्जाचे करायचे राहिलेत ?
जुने फुटपाथ काढून नवीन करायचे हा एक नवीन गोरख धंदा आहे. अनावश्यक विकास कामे थांबवा विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा आवश्यक्यता नसताना तीच तीच कामे पुन्हा पुन्हा करण्यास येत असून यात मोठा भ्रष्टाचार होत आहे
संपूर्ण पुणे शहरातील रस्त्यावर खड्डे आहेत खड्डे मुक्त पुणे होण्याची आवश्यकता आहे तसेच जागतिक दर्जाचे फुटपाथ अतिक्रमण मुक्त व्हायला हवेत त्यासाठी प्रयत्न करायला हवे.
या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी अल्पमुदतीची निविदा काढण्याचे षडयंत्र महानगरपालिकेच्या पथ विभागाने केले आहे.
हे ८८ कोटी रुपये पुण्यातले रस्ते नीट करण्यासाठी वापरावेत त्यानंतर आढावा घ्यावा आणि आढावा घेतल्यानंतर ज्या भागामध्ये फुटपाथची आवश्यकता आहे त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाला ती कामे करण्यासाठी निधी द्यावा.
88 कोटी रुपयाचे फूटपाथ ही पुण्याची सध्याची गरज नाही.
आपण या विषयांमध्ये लक्ष देऊन हे जागतिक दर्जाचे फुटपाथ हे षडयंत्र हा गोरख धंदा थांबवावा रस्त्यावर खड्डे आणि जागतिक दर्जाचे फुटपाथ ही पुणेकरांची चेष्टा होईल अर्थात असे फुटपाथ होणार नाही तर पण पैसे मात्र वाया जातील संस्थेचा पैसा आणि पैसा महत्त्वाचा आहे कारण तो प्रामाणिक करदात्याच्या करातून आलेला आहे बजेटमध्ये तरतूद आहे म्हणून पथविभागाने प्रस्ताव तयार केला हे चुकीचे आहे गरज आवश्यकता सर्वेक्षण आणि मग प्रस्ताव अशी प्रक्रिया असली पाहिजे परंतु पथ विभागाला मोठमोठे टेंडर काढण्यामध्ये सध्या रस असून टेंडर काढण्यामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत जाता जाता कल्याण करण्याच्या हेतूने हे सगळे प्रकार चालू आहेत आपण वेळीच हे थांबवावे या पत्राच्या प्रती पालक मंत्री, पुणे जिल्ह्यातील मंत्री,मनपाचे वरिष्ठ अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत


