Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट ब्रँड ‘जमतानी’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रणवीर सिंगची घोषणा;...

पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट ब्रँड ‘जमतानी’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रणवीर सिंगची घोषणा; ‘जमतानी’च्या वचनाला मिळणार नवी, दमदार ओळख

पुणे, महाराष्ट्र | १ सप्टेंबर २०२६: पुण्यातील विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या जमतानीने आपल्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘दिलेलं वचन म्हणजे ते पूर्ण करण्याची जबाबदारी’ या साध्या पण ठाम विचारावर जमतानीने आपली विश्वासार्हता उभी केली आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करणे, दर्जेदार बांधकाम, विश्वासार्हता आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी या मूल्यांमुळे जमतानीने गेल्या १६ वर्षांत हजारो घरमालकांचा विश्वास संपादन केला आहे.
आता कंपनी आपल्या विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असून, या नव्या प्रवासासाठी भारताचा लोकप्रिय आणि बहुआयामी अभिनेता रणवीर सिंग याची जमतानीच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही भागीदारी महत्त्वाकांक्षा, सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची वृत्ती आणि पारंपरिक चौकटी मोडून नवे काही करण्याच्या समान विचारांवर आधारित आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि स्वतःच्या मेहनतीने निर्माण केलेल्या यशस्वी प्रवासासाठी ओळखला जाणारा रणवीर सिंग हा जमतानीच्या पुढील वाटचालीतील दृष्टिकोनाशी उत्तम प्रकारे जुळणारा चेहरा आहे.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य पत्रकार परिषदेत या भागीदारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी जमतानीच्या आतापर्यंतच्या प्रवासासह ‘The Name is a Promise’ – ‘नाव म्हणजे एक वचन’ या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर रणवीर सिंगची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
या भागीदारीबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाला,
“माझा नेहमीच असा विश्वास आहे की कोणतीही मजबूत भागीदारी ही समान मूल्ये आणि भविष्यासाठीच्या समान दृष्टिकोनातून निर्माण होते. जमतानीसोबतची ही भागीदारी माझ्यासाठी त्यामुळेच विशेष आहे. दर्जा आणि विश्वासाच्या जोरावर या ब्रँडने एक मजबूत वारसा निर्माण केला आहे आणि त्याच्या पुढील प्रवासाचा भाग होताना मला अभिमान वाटतो.”
जमतानीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप जमतानी म्हणाले,
“रणवीर सिंगला आमच्यासोबत जोडण्यामागे या भागीदारीतून जमतानीसाठी काय साध्य करायचे आहे, याबाबतचा ठाम विश्वास आहे. रणवीरची ऊर्जा, महत्त्वाकांक्षा, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची वृत्ती आणि सतत प्रगती करण्याची धडपड ही आमच्या नव्या पर्वाच्या भावनेशी खूप जवळची आहे. संपूर्ण जमतानी कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि पुढे अनेक नव्या संधी आमची वाट पाहत आहेत.”
जमतानीच्या कार्यकारी संचालिका मीनाक्षी जमतानी म्हणाल्या,
“‘नाव म्हणजे एक वचन’ ही आमच्यासाठी केवळ सांगण्याची गोष्ट नाही, तर प्रत्यक्षात जगण्याची विचारधारा आहे. गेल्या अनेक वर्षांत आम्ही अधिक सक्षम व्यवस्था उभारण्यासोबतच ग्राहकांशी अधिक दृढ नाती निर्माण करण्यावर आणि त्यांच्या अनुभवाला केंद्रस्थानी ठेवणारी कार्यसंस्कृती विकसित करण्यावर भर दिला आहे. रणवीरची ऊर्जा आणि व्यक्तिमत्त्व या बदलत्या वाटचालीला उत्तम प्रकारे पूरक ठरते. त्यामुळे आमची वचनबद्धता अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याचवेळी आमची मूळ मूल्येही कायम राहतील.”
केवळ रिअल इस्टेटच्या पलीकडे – नाती आणि समुदाय उभारण्याची बांधिलकी
जमतानीची बांधिलकी केवळ घरांची निर्मिती आणि प्रकल्पांच्या पूर्ततेपुरती मर्यादित नाही. ‘Hamesha Aapke Saath’ या उपक्रमाच्या माध्यमातून घराचा ताबा दिल्यानंतरही ग्राहकांशी असलेले नाते अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तर ‘J-Tribe’च्या माध्यमातून विविध सण-समारंभ, क्रीडा उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांद्वारे रहिवाशांमध्ये आपलेपणा आणि समुदायाची भावना निर्माण केली जाते.
याशिवाय ‘Rising Stars’, ‘Shakti Edge’, CSR आणि शाश्वत विकासाशी संबंधित उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देणे यावरही जमतानीचा भर आहे.
जमतानीच्या पोर्टफोलिओमध्ये मिड-प्रीमियम, प्रीमियम आणि अल्ट्रा-लक्झरी निवासी प्रकल्पांसोबतच व्यावसायिक प्रकल्पांचाही समावेश आहे. कंपनीची ‘XO Signature Series’ ही अल्ट्रा-लक्झरी आणि दर्जेदार डिझाइनवर आधारित विशेष श्रेणी आहे.
सध्या पुण्यातील वेगाने विकसित होणाऱ्या बाणेर, बालेवाडी, वाकड, रावेत, ताथवडे, मुंढवा, कोरेगाव पार्क NX, खराडी आणि चार्होली या महत्त्वाच्या भागांमध्ये जमतानीचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये Ace Abundance, Ace Ayodhya, Ace Villas आणि SpaceBiz यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रासोबतच Jhamtani Cera-Kraft, Jhamtani Agencies आणि Jhamtani Prosumers Solar Pvt. Ltd. या माध्यमातूनही समूहाने बांधकाम क्षेत्र तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आपली उपस्थिती मजबूत केली आहे.
जमतानीविषयी
जमतानी समूहाला चार दशकांहून अधिक काळाची व्यावसायिक परंपरा असून, रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीचा अनुभव १६ वर्षांहून अधिक आहे. आतापर्यंत कंपनीने ३० लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. सध्या कंपनी ३२ हून अधिक निवासी, व्यावसायिक आणि मिश्र-वापराच्या प्रकल्पांमध्ये ४० लाख चौरस फुटांचे बांधकाम करत आहे. याशिवाय, चालू आर्थिक वर्षात लॉन्च होणाऱ्या प्रकल्पांसाठी आणखी ४० लाख चौरस फुटांचे क्षेत्रफळ तातडीच्या पाइपलाइनमध्ये आहे.
पुण्यातील १३,००० हून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन करत जमतानी पूर्व आणि पश्चिम पुण्यातील महत्त्वाच्या विकास मार्गांवर आपला विस्तार सातत्याने वाढवत आहे.
रणवीर सिंगच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून झालेल्या नियुक्तीसह जमतानी आता आपल्या पुढील पर्वात नव्या ऊर्जा आणि उत्साहाने प्रवेश करत आहे. मात्र, या नव्या प्रवासात कंपनीची मूलभूत मूल्ये आणि विश्वासाची परंपरा कायम राहणार आहे.
वारसा भक्कम आहे.
वचन आजही तेच आहे.
आता प्रवास एका नव्या पर्वाकडे सुरू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments