‘प्रॉफिट का रॉकेट’ – कमाई जास्तीत जास्त वाढवणारे, उत्पादकता सुधारणारे, ऑपरेटिंग खर्च कमी करणारे आणि बुद्धिमत्तापूर्वक अधिक नियंत्रण देणारे भारतातील पहिले हेवी कमर्शियल वेईकल.
उद्योगातील पहिल्या ४८-तासांच्या अपटाईम गॅरंटी* सह आणि पाच वर्षांत प्रति ट्रक १५ लाख रूपयांपर्यंत अतिरिक्त नफा देण्याच्या क्षमतेसह फायदेशीर व बुद्धिमत्तापूर्ण ट्रकिंगचा नवीन मापदंड प्रस्थापित.
सातत्याने जास्तीत-जास्त इंधन बचत प्रदान करणाऱ्या पेटंट-प्राप्त एआय-सक्षम आयफ्यूअलस्मार्ट ऑटो ड्राईव्ह मोडसह भारतातील सर्वात बुद्धिमान ट्रक.
श्रेणीतील सर्वोत्तम इंधन बचत आणि कामगिरीसाठी ऑप्टिमाइझ केलेल्या महिंद्राच्या नेक्स्ट-जनरेशन ३२० एचपी एमपावर इंजिनद्वारे समर्थित संपूर्ण श्रेणी.
फ्लीट मालकांसाठी रिमोट इग्निशन इनहिबिट आणि एसी वापर नियंत्रणासारख्या वैशिष्ट्यांसह सर्वात बुद्धिमत्तापूर्ण – आयमॅक्स २.० प्रगत फ्लीट टेलिमॅटिक्स सोल्यूशनसह उपलब्ध.
पुणे, सप्टेंबर ३, २०२६: महिंद्रा ट्रक अँड बस या महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने आज नवीन ब्लेजो आय-टीआरके लाँच करण्याची घोषणा केली. हा नेक्स्ट-जनरेशन हेवी कमर्शियल ट्रक ट्रान्सपोर्टर्स आणि फ्लीट मालकांसाठी एकाच मुख्य आश्वासनासह डिझाइन केला आहे – प्रॉफिट का रॉकेट.
केवळ एक ट्रक नसून एक पूर्ण व्यावसायिक सोल्यूशन म्हणून विशेषतः डिझाइन केलेला ब्लेजो आय-टीआरके श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, उच्च-कामगिरी पॉवरट्रेन, बुद्धिमत्तापूर्ण कनेक्टेड तंत्रज्ञान आणि उद्योगातील आघाडीची अपटाईम गॅरंटी यांना एकत्र आणतो. हे ग्राहकांना कमाई जास्तीत-जास्त वाढवण्यास, उत्पादकता सुधारण्यास, ऑपरेटिंग खर्च कमी करण्यास आणि त्यांच्या फ्लीटवर अधिक नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते.
ब्लेजो आय-टीआरके ग्राहकांच्या तीन महत्त्वाच्या आश्वासनांवर आधारित डिझाइन करण्यात आला आहे:
अधिक कमवा
१० टक्क्यांपर्यंत उत्तम इंधन कार्यक्षमता प्रदान करणारा ब्लेजो आय-टीआरकेमध्ये इंधनाच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत-जास्त फायदा मिळवण्यासाठी एआय-सक्षम आयफ्यूअलस्मार्ट ऑटो ड्राईव्ह मोड, टर्बोमॅक्स टर्बोचार्जर, ऑप्टिफ्यूअल एअर कॉम्प्रेसर आणि इतर अनेक हार्डवेअर सोल्यूशन्स व सॉफ्टवेअर नाविन्यतांसह प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही एकत्रित बचत पाच वर्षांत प्रति ट्रक १५ लाख रूपयांपर्यंतच्या* अतिरिक्त नफ्यात रूपांतरित होऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचा व्यवसाय वेगाने वाढवण्यास मदत होते.*
अधिक चालवा
संपूर्ण ब्लेजो आय-टीआरके श्रेणीमध्ये महिंद्राच्या विश्वासार्ह आणि श्रेणीतील सर्वोत्तम ३२० एचपी एमपावर इंजिनद्वारे समर्थित, हा ट्रक दमदार कामगिरी, उच्च विश्वासार्हता आणि अधिक उत्पादकता प्रदान करतो कॉम्फिमॅक्स सस्पेंडेड सीट, इझीक्रूझ क्रूझ कंट्रोल, हँड्सफ्री आणि सुरक्षित संवादासाठी माईकसह ब्लूटूथ-सक्षम म्युझिक सिस्टम, प्रशस्त, प्रीमियम आणि एर्गोनॉमिक एसी केबिनद्वारे चालकाच्या वाढलेल्या सोयीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात चालकांची कार्यक्षमता टिकून राहते; ज्यामुळे फ्लीटला अधिक कार्यक्षमतेने जास्त फेऱ्या पूर्ण करणे शक्य होते.
प्रत्येक ब्लेजो आय-टीआरकेला वाहनाची उपलब्धता जास्तीत-जास्त वाढवण्यासाठी आणि ऑपरेटिंग खर्च कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या महिंद्राच्या सर्वसमावेशक सेवा आश्वासन उपक्रमाचे पाठबळ लाभले आहे. याच्या केंद्रस्थानी उद्योगातील पहिली ४८-तासांची अपटाईम गॅरंटी* आहे, ज्या अंतर्गत ४८ तासांच्या* वचनबद्ध वेळेत वाहन पुन्हा रस्त्यावर न आल्यास ग्राहकांना दररोज १०,००० रूपये* मिळतील. याला राष्ट्रीय महामार्गांवर ७५ किमीच्या आत आणि राज्य महामार्गांवर ५० किमीच्या आत असलेल्या सर्व्हिस सेंटर्सच्या देशभरातील वाढत्या जाळ्याचे आणि महिंद्रा क्विक सर्व्हिस पॉइंट्सचे (एमक्यूएसपी) पाठबळ आहे.
या प्रस्तावाला अधिक दृढ करणारी महिंद्राची पार्ट्स सप्लाय गॅरंटी* आहे, जी डीलर नेटवर्कवर २५० महत्त्वाच्या सुट्या भागांची* उपलब्धता सुनिश्चित करते. पात्र गॅरंटीड पार्ट वचनबद्ध २४ तासांच्या कालावधीत उपलब्ध न झाल्यास, ग्राहक तो संबंधित पार्ट मोफत* मिळण्यास पात्र असेल. हे १०० हून अधिक पार्ट्सवर श्रेणीतील सर्वोत्तम वॉरंटी देखील प्रदान करते.
अधिक नियंत्रण ठेवा
ब्लेजो आय-टीआरके महिंद्राच्या आयमॅक्स २.० या नेक्स्ट-जनरेशन कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्मने सुसज्ज आहे. हे डेस्कटॉप आणि मोबाईल इंटरफेसद्वारे रिअल-टाईम वेईकल इंटेलिजन्स, प्रिडिक्टिव्ह डायग्नोस्टिक्स, ड्रायव्हरच्या वर्तनाची पाहणी, सर्व्हिस मॅनेजमेंट आणि कृतीयोग्य व्यवसाय माहिती प्रदान करते. अधिक हुशार निर्णय आणि प्रोअॅक्टिव्ह फ्लीट मॅनेजमेंट सक्षम करून, आयमॅक्स २.० ग्राहकांना नफा जास्तीत-जास्त वाढवण्यासोबतच ऑपरेशन्सची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
आमच्या ग्राहकांच्या हातात अधिक नियंत्रण देण्यासाठी, ब्लेजो आय-टीआरकेसह कस्टमाईज्ड आणि दीर्घकालीन (६ वर्षे/६ लाख किमी किंवा ८ वर्षे/८ लाख किमी) एमकेअर वार्षिक देखभाल करार (एएमसी) आणि एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन्स (टिप्पर्ससाठी ६ हजार-१० हजार तास) आता उपलब्ध आहेत, जे वाहनाच्या संपूर्ण मालकी प्रवासात कमी देखभाल खर्च आणि अधिक मानसिक शांतता सुनिश्चित करतात.
नवीन नाऊ २४x७ मोबाईल अॅप फ्लीट मालक आणि ट्रान्सपोर्टर्सच्या हातात पूर्ण नियंत्रण देते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या फोनवर एंड-टू-एंड डिजिटल ग्राहक अनुभव मिळतो. हे अॅप ग्राहकांना ब्रेकडाऊन असिस्टन्सच्या विनंत्या सबमिट करणे, ट्रॅक करणे आणि बंद करणे; ब्रेकडाऊन व्हॅनचे रिअल-टाईम लोकेशन पाहणे; दुरुस्तीच्या मंजूरीची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने जलद पार पाडणे; सुटे भाग थेट ऑर्डर करणे; सर्व सर्व्हिस हिस्ट्री एकाच ठिकाणी मिळवणे; आणि रिमाइंडर्ससह अपॉइंटमेंट्स बुक करणे सक्षम करते, ज्यामुळे कोणतीही सर्व्हिस चुकणार नाही. प्रत्येक संवादातून महिंद्राशी सातत्याने जोडलेले राहून, नाऊ२४x७ अॅप ग्राहकांना त्यांचा फ्लीट अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास, डाऊनटाईम कमी करण्यास आणि नेहमी पूर्ण नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
एकत्रितपणे, ही तीन आश्वासने ब्लेजो आय-टीआरकेला केवळ एका हेवी कमर्शियल वेईकलपेक्षा बरेच काही बनवतात. ही आश्वासने ग्राहकांना अधिक कमवा, अधिक चालवा आणि अधिक नियंत्रण ठेवा यासाठी मदत करणारी एक संपूर्ण प्रॉफिटॅबिलिटी इकोसिस्टम तयार करतात, जी संपूर्ण मालकी कालावधीत मोजण्यायोग्य व्यवसाय मूल्य प्रदान करते.
ब्लेजो आय-टीआरके रस्त्यावरील लक्षवेधक उपस्थिती आणि उपयुक्त अभियांत्रिकी यांचा मेळ घालण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. महिंद्राच्या आधुनिक हेवी कमर्शियल वेईकल ओळखीला प्रबळ करत वाहनाची कामगिरी, टिकाऊपणा आणि ड्रायव्हरची सोय सुधारण्यासाठी प्रत्येक डिझाइन घटक विकसित केला गेला आहे.
महिंद्रा ब्लेजो आय-टीआरके श्रेणी ३ रंगांमध्ये येते आणि सर्व प्रकारच्या व्हेरियंट्स आणि अॅप्लिकेशन्समध्ये उपलब्ध असेल.
इंटेलिकोर डिझाइन
ब्लेजो आय-टीआरकेची डिझाइन महिंद्राच्या हेवी कमर्शियल वेईकल श्रेणीतील इंटेलिकोर डिझाइन तत्त्वज्ञानाची पहिली अभिव्यक्ती आहे. याच्या केंद्रस्थानी, इंटेलिकोर ट्रकच्या प्रत्येक पैलूमध्ये व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि हेतू यांचा मेळ घालते, ज्यामुळे स्वरूप आणि कार्य एकत्र येऊन उत्कृष्ट मालकी आणि ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करतात.
प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत घटक वापरातील सहजता वाढवतानाच वाहनाची क्षमता दर्शवण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन केला गेला आहे. ट्रकची रुंद ग्रिल ताकद आणि कामगिरीचे प्रतिनिधित्व करते, ज्याला ट्रकची रस्त्यावरील आकर्षक उपस्थिती वाढवणाऱ्या फुल-साइज, हाय-परफॉर्मन्स हेडलॅम्प्सची जोड दिली आहे. आतून, केबिनची संकल्पना एका चालकाचे ऑफिस म्हणून केली गेली आहे, जी सहज आणि एर्गोनॉमिक लेआउटसह ड्रायव्हरवर केंद्रित आहे, ज्यामुळे प्रत्येक काम सोपे आणि कार्यक्षम होते. या डिझाइन लँग्वेजला पूर्ण करणारा स्कायलाईन ब्लू हा विशिष्ट बॉडी कलर ब्लेजो आय-टीआरकेचे शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि व्यावसायिक रूप दर्शवतो.
या लाँचबद्दल मत व्यक्त करत ट्रक्स अँड बसेसचे अध्यक्ष, एसएमएल महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आणि महिंद्रा ग्रुपच्या ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य श्री. विनोद सहाय म्हणाले, “भारतातील मालवाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्र वाढीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे तंत्रज्ञान, विश्वासार्हता आणि कार्यकारी कार्यक्षमता ही स्पर्धात्मकता ठरवेल आणि रीसेलसारख्या जुन्या संकल्पना प्रासंगिक राहणार नाहीत. आमची महत्त्वाकांक्षा केवळ उत्तम ट्रक्स बनवणे ही नाही, तर नवोन्मेष आणि प्रबळ ग्राहक भागीदारीद्वारे कमर्शियल मोबिलिटीच्या भविष्याला आकार देणे ही आहे. ब्लेजो आय-टीआरके इंटेलिजंट ट्रकिंगद्वारे या तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो आणि खऱ्या अर्थाने ‘प्रॉफिट का रॉकेट’ आहे; ज्यामध्ये उद्योगातील इतर ट्रक्सच्या तुलनेत पाच वर्षांत प्रति ट्रक १५ लाख रुपयांपर्यंत* नफा वाढवण्याची क्षमता आहे. त्याच वेळी, ही उद्योगातील पहिली आणि अतुलनीय अपटाईम गॅरंटी घेऊन येते.”
परिशिष्ट
३२० एचपी एमपावर इंजिन
ब्लेजो आय-टीआरकेच्या केंद्रस्थानी महिंद्राचे प्रगत ७.२-लीटर एमपावर इंजिन आहे, जे आता संपूर्ण ब्लेजो श्रेणीमध्ये ३२० एचपी शक्ती प्रदान करते. यामुळे सर्व हेवी कमर्शियल वेईकल श्रेणीमध्ये या स्तराची पॉवर ऑफर करणारी महिंद्रा या सेगमेंटमधील एकमेव ओएम ठरली आहे.
११०० ते १७०० आरपीएमच्या विस्तृत ऑपरेटिंग रेंजमध्ये ११०० एनएम टॉर्क निर्माण करणारे हे इंजिन वेगवेगळ्या रस्त्यांच्या आणि वजनाच्या परिस्थितीत उत्तम ओढण्याची ताकद, उत्कृष्ट ग्रेडॅबिलिटी आणि सोपे क्रूझिंग प्रदान करते.
विस्तृत टॉर्क बँड गियर बदलण्याची गरज कमी करतो आणि वाहनाचे अधिक सुरळीत संचालन सक्षम करतो, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता सुधारते, ड्रायव्हरची सोय वाढते आणि ऑपरेटिंग खर्च कमी होतो.
इंजिनमध्ये इंधन कार्यक्षमता वाढवणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे:
टर्बोमॅक्स
एमपावर ३२० एचपी इंजिनमध्ये टर्बोमॅक्स टर्बोचार्जर बसवण्यात आला आहे, जो इंजिनमधील एअरफ्लो सुधारण्यासाठी उच्च बूस्ट प्रेशरसह डिझाइन केला गेला आहे.
वाढलेला एअरफ्लो अधिक कार्यक्षम ज्वलन सक्षम करतो, ज्याच्या परिणामी लो-एंड टॉर्क सुधारतो, ड्रायव्हिंग अधिक सुरळीत होते आणि इंधनाची बचत होते. इंजिनच्या कमी वेगातही अधिक ओढण्याची ताकद उपलब्ध होत असल्याने, ट्रकला कमी गियर बदलावे लागतात, ज्यामुळे कमी इंधन वापरून गती कायम ठेवणे शक्य होते.
टर्बोमॅक्स अतिरिक्त इंधन कार्यक्षमतेत योगदान देते, ज्यामुळे ते ब्लेजो आय-टीआरकेच्या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या प्रमुख तंत्रज्ञानांपैकी एक ठरते.
ऑप्टिफ्यूअल
बुद्धिमत्तापूर्ण ऑप्टिफ्यूअल ऑप्टिमाइज्ड पॉवर रिडक्शन एअर कॉम्प्रेसर सुनिश्चित करतो की, इंजिनच्या ताकदीचा वापर केवळ आवश्यकतेनुसारच केला जाईल.
इच्छित एअर प्रेशर प्राप्त झाल्यावर हा स्मार्ट कॉम्प्रेसर आपोआप डीसएंगेज होतो, ज्यामुळे इंजिनमधून अनावश्यक ऊर्जा खेचली जाणे टळते. अतिरिक्त ऊर्जेचा अपव्यय कमी करून, ऑप्टिफ्यूअल इंजिनच्या अधिक ताकदीचा वापर दुय्यम कार्यांऐवजी वाहनाच्या हालचालीसाठी करण्यास मदत करतो.
याच्या परिणामामुळे इंधन कार्यक्षमता अधिक सुधारते, ज्याचा थेट फायदा ऑपरेटिंग खर्च कमी होण्यात आणि नफा वाढण्यात होतो.
एआय-सक्षम आयफ्यूअलस्मार्ट
इंधन कार्यक्षमतेच्या पॅकेजचे नेतृत्व करत आहे आयफ्यूअलस्मार्ट, जे हेवी कमर्शियल वेईकल सेगमेंटमधील भारतातील पहिले एआय-सक्षम ऑटोमॅटिक ड्राईव्ह मोड आहे.
पारंपारिक ट्रक्सपेक्षा वेगळे, जिथे ड्रायव्हर्सना ऑपरेटिंग मोड मॅन्युअली निवडावे लागतात, तिथे आयफ्यूअलस्मार्ट हे रस्त्याचा उतार/चढ, लोडची स्थिती आणि ड्रायव्हिंगच्या गरजांचे सतत विश्लेषण करून रिअल-टाईममध्ये आपोआप सर्वोत्तम ड्राईव्ह मोड निवडते. बदलत्या ऑपरेटिंग परिस्थितीनुसार इंजिनच्या कामगिरीचे बुद्धिमत्तापूर्वक समायोजन करून, हे सिस्टम ट्रक नेहमी सर्वाधिक इंधन-कार्यक्षम स्थितीत धावत राहील याची खात्री करते.
हे एआय-सक्षम तंत्रज्ञान मोड निवडीसाठी ड्रायव्हरच्या निर्णयावरील अवलंबित्व संपवते, ज्यामुळे प्रत्येक प्रवासात सातत्यपूर्ण कामगिरीची खात्री मिळते.
आयमॅक्स २.०
आधुनिक फ्लीट व्यवस्थापनासाठी डिझाइन केलेले, आयमॅक्स २.० फ्लीट मालकांना वाहनाची सुस्थिती, ड्रायव्हरची कामगिरी, देखभालीच्या गरजा आणि ऑपरेशन्सची कार्यक्षमता याविषयी पूर्ण पारदर्शकता देते; ज्यामुळे त्यांना डाऊनटाईम कमी करण्यास, उत्पादकता सुधारण्यास आणि प्रत्येक वाहनातून जास्तीत-जास्त परतावा मिळवण्यास मदत होते. हे खालील नवनवीन वैशिष्ट्ये प्रदान करते, जे उद्योगातील पहिले आहेत आणि ग्राहकांना पूर्ण नियंत्रण देतात:
रिमोट एसी मॅनेजमेंट
फ्लीट मालक ऑपरेटिंग गरजांनुसार एअर कंडिशनिंग सिस्टम दूरस्थपणे चालू किंवा बंद करू शकतात. एसीच्या वापराचे योग्य नियोजन करून, हे वैशिष्ट्य आवश्यकतेनुसार ड्रायव्हरची सोय राखताना इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
रिमोट वेईकल क्रँक इनहिबिट
हे वैशिष्ट्य मालकांना अनधिकृतपणे इंजिन सुरू होण्यापासून दूरस्थपणे रोखण्याची सुविधा देते, ज्यामुळे चोरी किंवा गैरवापराच्या परिस्थितीत वाहनाची सुरक्षितता वाढते आणि फ्लीट मालमत्तेवर अधिक नियंत्रण सुनिश्चित होते.
एअर फिल्टर क्लॉगिंग अलर्ट्स
ही सिस्टम एअर फिल्टरच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवते आणि फिल्टर जाम झाल्यास वेळेवर सूचना देते. वेळेवर घेतलेली दखल इंजिनची उत्तम कामगिरी राखण्यास मदत करते, तसेच टाळता येण्याजोगे ब्रेकडाऊन आणि इंधन कार्यक्षमतेचे नुकसान रोखते.
डीपीएफ परफॉर्मन्स अलर्ट्स
रिअल-टाईम डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर (डीपीएफ) मॉनिटरिंग वेळेवर रिजनरेशन सक्षम करते; ज्यामुळे महागड्या दुरुस्तीचा खर्च आणि अनियोजित डाऊनटाईमचा धोका कमी होऊन वाहनाची विनाअडथळा कामगिरी सुनिश्चित होते.
डिस्टन्स-टू-एम्टी (डीटीई) मॉनिटरिंग
एकात्मिक डीटीई वैशिष्ट्य डिझेल आणि अॅडब्लू दोन्हीसाठी उर्वरित ड्राईव्हिंग रेंजची अचूक माहिती देते; ज्यामुळे ड्रायव्हर्स आणि फ्लीट ऑपरेटर्सना इंधन भरण्याच्या थांब्यांचे अधिक कार्यक्षमतेने नियोजन करणे आणि ऑपरेशन्समधील व्यत्यय कमी करणे शक्य होते.
फ्लीटसेन्स रिपोर्ट्स
सर्वसमावेशक फ्लीटसेन्स अहवाल फ्लीटचा वापर, वाहनाची कामगिरी आणि ऑपरेटिंग ट्रेंड्सबद्दल मोलाची माहिती प्रदान करतात; ज्यामुळे फ्लीट मालक मार्ग ऑप्टिमाइझ करणे, कार्यक्षमता सुधारणे आणि नफा वाढवणे यांत सक्षम होतो.
स्कोरमॅक्स ड्रायव्हर परफॉर्मन्स अॅनालिटिक्स
स्कोरमॅक्स ड्रायव्हिंगचे वर्तन आणि वाहनाचे संचालन याचे विश्लेषण करून ड्रायव्हरचे तपशीलवार स्कोरकार्ड तयार करते. हे वैशिष्ट्य फ्लीट मालकांना सुधारणेच्या संधी ओळखण्यास, ड्रायव्हिंगच्या उत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यास आणि संपूर्ण फ्लीटमध्ये इंधन कार्यक्षमता सुधारण्यास सक्षम करते.
ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम – ऐच्छिक
डीलर-फिटमेंट पर्याय म्हणून उपलब्ध असलेली २-वे कॅमेरा आधारित ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम रस्ता सुरक्षेच्या घटनांवर लक्ष ठेवून सुरक्षा वाढवते; तसेच कॅमेरा आधारित ड्रायव्हरची ओळख, सीट बेल्टचा वापर आणि ड्रायव्हरचा थकवा किंवा डुलकीची लक्षणे ओळखण्यासारखी वैशिष्ट्ये प्रदान करते. यामुळे वेळेवर सुधारणात्मक कारवाई करणे आणि अधिक सुरक्षित फ्लीट ऑपरेशन्सना प्रोत्साहन देणे शक्य होते.
कॉम्फिमॅक्स सस्पेंडेड सीट
एर्गोनॉमिकली डिझाइन केलेली थ्री-वे अॅडजस्टेबल सस्पेंडेड सीट कंपने आणि रस्त्यावरील धक्के लक्षणीयरित्या कमी करते, तसेच ड्रायव्हरच्या वजनानुसार अॅडजस्ट होते. याचा परिणाम म्हणजे कमी थकवा, सुधारित पोश्चर आणि लांबच्या प्रवासात अधिक सोय; ज्यामुळे ड्रायव्हर्सना लांब पल्ल्याच्या प्रवासातही कार्यक्षम राहणे शक्य होते.
इझीक्रूझ क्रूझ कंट्रोल
इझीक्रूझ सिस्टम एक्सीलेटरवर सतत पाय न ठेवता स्थिर गती कायम ठेवते; ज्यामुळे हायवेवरील ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर होते आणि सुधारित कार्यक्षमतेसाठी नियंत्रित इंधन पुरवठा सुनिश्चित होतो. हे ड्रायव्हरचा थकवा कमी करते आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक सुरळीत संचालन सक्षम करते. इतर वाहनांच्या तुलनेत, इझीक्रूझ हे डॅशबोर्डवर बसवलेल्या एर्गोनॉमिक बटणांद्वारे वापरण्यास अतिशय सोपे आहे, ज्यामुळे त्याचा वारंवार आणि सहज वापर होतो.
हेव्ही ड्युटी ४३० मिमी क्लच
इंटेग्रेटेड वेअर इंडिकेटरसह असलेला मोठा क्लच अधिक सुरळीत टॉर्क ट्रान्सफर, सुधारित उष्णता उत्सर्जन आणि क्लचचे दीर्घ आयुष्य प्रदान करतो. हे डिझाइन गियर बदलण्याचे प्रयत्न कमी करतानाच देखभालीची गरज कमी करते, ज्यामुळे उच्च अपटाईम आणि कमी लाईफसायकल खर्च मिळतो. हे सर्व ९-स्पीड ट्रान्समिशन मॉडेल्सवर उपलब्ध आहे.
फॅक्टरी-फिटेड एसी केबिन आणि एंटरटेनमेंट सिस्टम
ब्लेजो आय-टीआरकेमध्ये अत्यंत प्रशस्त आणि आरामदायक एसी केबिनसह फॅक्टरी-फिटेड म्युझिक सिस्टम देण्यात आली आहे; ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एफएम/एएम रेडिओ, यूएसबी चार्जिंग, ऑक्स सपोर्ट आणि हँड्सफ्री कॉल्ससाठी स्वतंत्र मायक्रोफोन (एमआयसी) समाविष्ट आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक आनंददायी आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचे वातावरण तयार होते.
नाऊ २४x७ मोबाईल अॅप
ब्लेजो आय-टीआरकेची इकोसिस्टम महिंद्राच्या प्रगत नाऊ २४x७ मोबाईल अॅपद्वारे वाहनाच्या पलीकडे विस्तारते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या फ्लीटसाठी महिंद्राशी सतत जोडलेले राहणे शक्य होते.
हे अॅप्लीकेशन (अॅप) ग्राहकांना खालील सुविधा देते:
सर्व्हिस रिक्वेस्ट सबमिट आणि ट्रॅक करणे
सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक करणे
वाहनाची संपूर्ण सर्व्हिस हिस्ट्री पाहणे
रोडसाईड असिस्टन्सची विनंती करणे
सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) ऑर्डर करणे
ब्रेकडाऊन व्हॅनचे लाईव्ह लोकेशन पाहणे
डिजिटल मंजूरी आणि सर्व्हिस अपडेट्स पाहणे
सर्व्हिस, देखभाल आणि फ्लीट मॉनिटरिंग एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून, हे अॅप प्रतिसाद वेळ आणि कार्यक्षमता सुधारतानाच फ्लीट व्यवस्थापन अत्यंत सोपे करते.
एरोकिट-रेडी डिझाइन
ब्लेजो आय-टीआरकेमध्ये उत्तम एरोडायनॅमिक्स आणि इंधन कार्यक्षमता अधिक सुधारण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रात एरो किट सहज बसवण्यासाठी फॅक्टरी-इंजिनिअर्ड प्रावधाने देण्यात आली आहेत.
हे केवळ इन्स्टॉलेशन सोपे करत नाही, तर पारंपारिक आफ्टरमार्केट बदलावांमुळे होणारे केबिन लीकेज, गंज लागणे आणि रचनात्मक नुकसान टाळते; ज्यामुळे सुधारित एरोडायनॅमिक कार्यक्षमतेला पाठबळ देतानाच दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित होतो.
अधिक कमवा, अधिक चालवा आणि अधिक नियंत्रण ठेवा यावर केंद्रित असलेल्या आपल्या सर्वसमावेशक प्रस्तावासह, ब्लेजो आय-टीआरके उच्च नफाक्षमता, अधिक विश्वासार्हता आणि अधिक स्मार्ट फ्लीट व्यवस्थापन शोधणाऱ्या ट्रान्सपोर्टर्ससाठी एक अत्यंत आकर्षक मूल्य प्रस्ताव प्रदान करतो. महिंद्राच्या ग्राहक-केंद्रित सर्व्हिस इकोसिस्टमचे आणि उद्योगातील आघाडीच्या अपटाईम अॅश्युरन्स प्रोग्राम्सचे पाठबळ लाभलेला ब्लेजो आय-टीआरके भारतातील हेवी कम
र्शियल वेईकल उद्योगासाठी व्यावसायिक कामगिरीची पुनर्रचना करण्यासाठी डिझाइन केला आहे.


