Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवृत्त हवाई योद्धा माजी ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांना शिवाजी...

निवृत्त हवाई योद्धा माजी ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान

 

 

पुणे

(प्रतिनिधी)

“इंडियन मिलिटरी ऑपरेशन्स- परसेपशन्स अँड प्रेझेंटेशन इन सिलेक्टेड वॉर नॉन फिक्शन्स अँड वॉर मुव्हीज” या विषयावर भारतीय हवाई दलातील माजी ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांनी शिवाजी विद्यापीठास शोधनिबंध सादर केला असून त्यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी प्राप्त झाली आहे.मानव विज्ञान विद्या शाखेतून इंग्रजी विषयातील पीएच.डी प्राप्त साठी डॉ तृप्ती करेकट्टी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

श्रीकांत वालवडकर यांनी हवाई दलात सत्तावीस वर्षे सेवा बजावली असून २००९ मध्ये स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते असून पूर्व सैनिकांसाठी सेवा देत आहेत.अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या पश्चिम प्रांताचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

त्यांच्या ह्या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रजनीश कामत,कुलसचिव विलास शिंदे,डॉ तृप्ती करेकट्टी,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त),एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य ( निवृत्त ),विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments