पुणे, ३ सप्टेंबर, २०२६: सध्याचे बदलते आर्थिक संकेत आणि शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणुकीचे वातावरण अस्थिर बनले आहे. अशा काळात, बाजारातील घसरणीपासून सुरक्षितता मिळवण्यासोबतच गुंतवणुकीत दीर्घकालीन वाढ हवी असणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी ‘ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स’ने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. गुंतवणूकदारांच्या या बदलत्या पसंतीची दखल घेत, जोखीम आणि परतावा यांचा योग्य समतोल साधणाऱ्या ‘हायब्रिड अलोकेशन स्ट्रॅटेजीज’मध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग झपाट्याने वाढत असल्याचे उद्योग क्षेत्रातील आकडेवारीवरून स्पष्ट होते.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात छोट्या गुंतवणूकदारांनी केवळ शेअर बाजारात पैसे लावण्याऐवजी हायब्रिड कॅटेगरीला अधिक पसंती दिली आहे. गुंतवणूकदारांचा हा कल सातत्याने वाढत आहे. जुलै २०२६ अखेरपर्यंत, संपूर्ण म्युच्युअल फंड क्षेत्रात ‘अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स’ अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता २.६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत या फंड्समध्ये १०,३४३ कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे.
गुंतवणूकदारांच्या याच वाढत्या कलानुरूप, ‘टाटा ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड’ला गुंतवणूकदारांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत या फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता सुमारे ४,०७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. फंडाच्या समभाग आणि कर्जरोखे यांच्यातील संतुलित गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा असलेला दृढ विश्वास या आकडेवारीतून स्पष्ट होतो. या फंडाने प्रामुख्याने वित्तीय सेवा, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, ऑटोमोबाईल आणि टेलिकॉम अशा आघाडीच्या पाच क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
गुंतवणूकदारांचा हा वाढता कल प्रादेशिक पातळीवर प्रकर्षाने जाणवत आहे. पुण्यामध्ये ‘टाटा ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड’ने ऑगस्ट २०२६ मध्ये तब्बल २.५६ कोटी रुपयांची एकूण विक्री नोंदवली आहे. एप्रिल २०२६ मधील ८२.०१ लाख रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत यामध्ये २१२% ची अफाट वाढ झाली आहे. तसेच, फंडाची मासिक सरासरी मालमत्ता मार्च २०२६ मधील २९६ कोटी रुपयांवरून ८.९% ने वाढून ऑगस्ट २०२६ मध्ये ३२२.९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पुण्याच्या किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली जागरूकता आणि त्यांची बदलती आवड या आकडेवारीतून स्पष्ट होते. शेअर बाजारातील वाढीचा फायदा घेतानाच, फिक्स्ड-इन्कमच्या स्थिरतेमुळे गुंतवणुकीतील जोखीम कमी करणाऱ्या हायब्रिड स्ट्रॅटेजीजकडे पुणेकरांचा ओढा वेगाने वाढत आहे. (स्रोतः अंतर्गत आकडेवारी)
पूर्वी ‘बॅलन्स्ड फंड्स’ म्हणून ओळखले जाणारे ‘ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स’ प्रामुख्याने शेअर बाजारात ६५% ते ८०% गुंतवणूक करतात, जेणेकरून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळावा. तर उर्वरित २०% ते ३५% रक्कम कर्जरोखे आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवली जाते, जेणेकरून बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणुकीला स्थैर्य आणि सुरक्षितता मिळावी. या फंडांमधील ऑटोमेटेड असेट अलोकेशन गुंतवणूकदारांना घाईघाईत किंवा भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवते आणि बाजाराच्या चढ-उतारांनुसार गुंतवणुकीचा समतोल आपोआप राखते.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर सतीश चंद्र मिश्रा म्हणाले, “आजच्या अस्थिर बाजारपेठेत गुंतवणुकीची वाढ आणि भांडवलाचे रक्षण या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधणे अत्यंत आवश्यक आहे. ‘ऍग्रेसिव्ह हायब्रिड स्ट्रॅटेजीज’ गुंतवणूकदारांना हाच उत्तम ताळमेळ मिळवून देतात. या फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एका बाजूला भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये (इक्विटीद्वारे) सहभागी होण्याची संधी मिळते, तर दुसऱ्या बाजूला यातील डेट घटक बाजारातील चढ-उतारांचे धक्के पचवण्याचे काम करतो. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा एक शिस्तबद्ध आणि बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या स्थितीत टिकणारा उत्तम पर्याय आहे. यामुळे बाजारात कधी उतरायचे आणि कधी बाहेर पडायचे, याची चिंता न करता गुंतवणूकदारांना त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टे गाठणे सोपे होते.”
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी ‘ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स’ हे निवृत्तीनंतरचे जीवन किंवा भविष्यासाठी मोठी संपत्ती निर्माण करणे अशा दीर्घकालीन उद्दिष्टांचा भक्कम पाया ठरतात. विशेषतः, शिस्तबद्ध ‘सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी करून गुंतवणूकदारांना दीर्घकाळात उत्तम नफा मिळवून देण्यास मदत करते.


