Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व मतदारसंघांमध्ये जनजागृती मोहीम*

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व मतदारसंघांमध्ये जनजागृती मोहीम*

 

 

पुणे, दि. ४: जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत एएसडीडी यादीमधील जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी याउद्देशाने सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत विशेष जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मोहिमेद्वारे १ ऑक्टोबर २०२६ रोजी अठरा वर्षे पूर्ण करीत असलेल्या तसेच तृतीयपंथीय व्यक्ती, अल्पसंख्यांक जनसमुदाय, महिला, दिव्यांग यांचे मतदार यादीत नोंदणी होण्यासाठी ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर २८ लाख ६६ हजार ४६१ मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत. शिबिरांमध्ये याबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट होतील यासाठी स्वीप अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी कळविले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments