पुणे – डी जे वर बंदी हवीच…
बापटांना झालेल्या मारहाणीचा निषेधचं…
पण त्या आडून आता हिंदू धर्मावर टीका आणि सरसकट गणेश मंडळ कार्यकर्त्यांना व्हिलेन ठरविणे थांबलेच पाहिजे….असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले आहे.त्यांनी म्हटले आहे की
माझ्या फेसबुक पोस्ट वर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व माझे स्नेही विश्वम्भर चौधरी यांनी एक कंमेंट केली… त्याला खर्डेकर यांनी दिलेले उत्तर… खालील प्रमाणे आहे 👇
Vishwambhar Choudhari सर, with due respect… पुणे ही बुद्धिवाद्यांचे शहर आहे… इथे प्रत्येकाचे स्वतः चे असे ठाम मत आहे…
खरं ते माझं पेक्षा माझं ते खरं असे म्हणणारे, वाटणारे ही आहेत… अनेक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना असो वा महापुरुषांची जयंती साजरी करणाऱ्या अथवा ईद सारखे सण साजरे करणाऱ्यांना डीजे आवडतो,
त्यांचे प्रबोधन करून हळूहळू पुढील 2/4 वर्षात त्यावर बंदी येऊ शकेल… केवळ पोलीसी खाक्या दाखवून, खटले दाखल करून, साउंड जप्त करून हे होईल असे मानणे अयोग्य आहे…
यां वर्षी शेकडो मंडळानी प्लाझ्मा, लेझर, प्रेशर मिड याला स्वयं स्फूर्ती ने नाकारले आहे…. एक दिवस डीजे ही नाकारतील…
राहिला शहर अध्यक्षांचा विषय तर धीरजजी हे गणेशोत्सवातून पुढे आलेले नेते आहेत, ते भावनिक आहेत, आपल्या बाप्पा वर, उत्सवावर हल्ला होतोय यातून ते दुखावले गेले आणि बोली भाषेतलं एक वाक्य बोलून गेले… त्यावर लक्ष केंद्रित करून भाजपा ला झोडपण्यात काहीच हशील नाही…
धीरजजी पक्षनिष्ठ, तत्व निष्ठ कार्यकर्ते आहेत….
मा. देवेंद्रजी यांच्या सह ना. चंद्रकांतदादा, ना. मुरलीधर मोहोळ, खा. मेधा कुलकर्णी यांनी पक्षाची लाईन ठरविल्यावर विषय संपतो…
मी वर म्हंटल्याप्रमाणे सोलापूर, नागपूर आणि पुणे यात फरक आहे… पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झालाय…. इथे गल्लोगल्ली गणरायाची प्रतिष्ठापना होते…. थोडा वेळ द्या डीजे ही हद्दपार होईल….
एक मात्र नक्कीच की काही डीजे प्रेमीं मंडलांसाठी आपण संपूर्ण गणेशोत्सव किंवा त्याच्याशी जोडलेल्या हजारो कार्यकर्त्यांना बोल लावू नका…. शेकडो मंडळाचे हजारो कार्यकर्ते वर्षभर सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात… कोरोना काळात तर ते उभे राहिलेच पण गल्लीत कोणाच्या घरातील शुभकार्य असो वा दुःखाचा प्रसंग….कोणाला रक्ताची गरज असेल वा मयत / आजारपण… हेच कार्यकर्ते धावून जातात… त्यामुळे ह्या उत्सवाकडे जरा पॉसिटीव्हली ही बघा…. कुरिती एका रात्रीत दूर होतं नसतात… अगदी महात्मा जोतिबा फुले ते गोपाळ गणेश आगरकर ते स्वातंत्र्यवीर सावरकर यां सर्वांनाही बदल घडविण्यासाठी संघर्ष करावी लागला… मोठा कालावधी खर्च करावा लागला… त्यामुळे उतावळेपणाने कृती करून परिस्थिती चिघळू न देणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे… लोकमान्यांनी हा उत्सव सार्वजनिक केला त्यामागची भावना लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले तरच हे शक्य होईल….🙏


