पुणे, दि.८: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता कौशल्य व क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मिळावा यांच्या माध्यमातून विविध उद्योग कंपन्या व आस्थापनांवरे मधील रोजगाराच्या संधी योग्य होती ना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रोजगार मेळावा केंद्रांमध्ये सीओईपी टेक्नॉलॉजीकल यूनिव्हर्सिटी, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी,येरवडा, के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कर्वेनगर, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, येवलेवाडी, ज्ञानविलास कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, डुडुळगाव जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, हडपसर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पिंपरी चिंचवड यांचा समावेश आहे.
तसेच जुन्नर येथे जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मावळ येथील इंद्रायणी महाविद्यालय, इंदापूर येथील विठ्ठलराव थोरात खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दौंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुळशी येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, शिरूर येथील कौशल्य विकास केंद्र, एमआयडीसी रांजणगाव, खेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बारामती येथील विद्याप्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि आंबेगाव येथील शासकीय पॉलीटेक्निक, अवसरी या ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवार आणि www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळासह http://forms.gle/vbtzrokybbubt4em7 या लिंक वर नोंदणी करावी. मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलियार रोड,पुणे येथे प्रत्यक्ष अथवा ०२०- २६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे सु. रा. वराडे यांनी कळविले आहे.
००००


