New Delhi, 2nd April 2024: नीलकमल स्लिपतर्फे आज बॉलिवूड स्टार रणबीर कपूर याच्या नावाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली. या सहयोगातून उत्साही प्रवासाचा शुभारंभ होणार असून मॅट्रेस उद्योगात क्रांती आणण्यासाठी तसेच आपले ब्रँड तत्त्वज्ञान “थॉटफूली डिझाईन्ड फॉर यू” (“तुमच्याकरिता विचारपूर्वक तयार केलेले”) ला पुढे आणण्यासाठी या ब्रँडने प्रतिथयश कलाकाराला सोबत घेतले आहे.
सुमारे 30 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा असलेल्या, नीलकमलने स्वतःला भारतातील आघाडीच्या फर्निचर कंपन्यांपैकी एक म्हणून स्थापित केले आहे. रणबीर कपूरसोबतचा हा सहयोग नीलकमल स्लिप्सला ग्राहकांसाठी, विशेषतः नवीन काळातील ग्राहकांसाठी विचारपूर्वक तयार केलेला झोपेशी संबंधित पर्याय म्हणून उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. भारतातील सर्वात प्रिय आणि चतुरस्त्र अभिनेत्यांपैकी एक म्हणून रणबीरचे व्यक्तिमत्व, त्याला असलेला वारसा हा उत्पादन प्रस्ताव आणि नवकल्पनांद्वारे व्यक्तींच्या झोपेशी संबंधित विविध गरजा पूर्ण करण्याच्या ब्रँडच्या प्रवासाशी सुसंगत आहे.
मॅट्रेस, बेड, उशा आणि अॅक्सेसरीज यासारख्या स्लिप सोल्यूशन्ससाठीच्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह प्रत्येक ग्राहकाच्या झोपेशी संबंधित सवयींची पूर्तता करणे हे नीलकमल स्लीपचे उद्दिष्ट आहे.
या घोषणेवर भाष्य करताना, नीलकमल स्लिपचे प्रमुख ईशान पारेख म्हणाले, “आमचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नीलकमल स्लीप कुटुंबात रणबीर कपूरचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या गुणी अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वला असलेला वेग आमच्या ब्रँडशी पूर्णपणे मिळता-जुळता असून निरोगी झोप आणि अतुलनीय आरामाला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या संदेशाला आणखी मजबूत करेल. रणबीरची लोकप्रियता आणि नवीन काळातील प्रेक्षकांमधील सापेक्षता घटक आमची उपस्थिती बळकट करेल ही खात्री आम्हाला वाटते. ही भागीदारी मॅट्रेससाठी देखील वचनबद्ध आहे. कारण आम्ही मॅट्रेस श्रेणीत क्रांती घडवून आणणे आणि पुढील दोन वर्षांत सर्वात मातब्बर नाव म्हणून उदयास येण्यासाठी उत्सुक आहोत”.
या भागीदारीविषयी बोलताना बॉलिवूड अभिनेता आणि नीलकमल स्लिप’चा ब्रँड अॅम्बेसेडर रणबीर कपूर म्हणाला, “मला नीलकमल स्लिपसोबत भागीदारीचा आनंद वाटतो, हा वारसा राखत आलेला ब्रॅंड असून गुणवत्तापूर्ण झोपेचे महत्त्व खऱ्या अर्थाने ओळखून आहे आणि व्यक्तिच्या झोपेसंबंधी सवयींचा आदर करते. झोपेचा दर्जा चांगला ठेवण्यात मॅट्रेस (गादी) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते हा विश्वास मला आहे आणि नीलकमल स्लिपकडे भरपूर विस्तृत उत्पादन श्रेणी आहे. जी अपवादात्मकरित्या आरामदायी, आणि अस्सल निवांत झोपेचा
अनुभव देतात”.
नीलकमल स्लिपतर्फे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रणबीर कपूरला पसंती
RELATED ARTICLES


