पुणे,9 सप्टेंबर 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे जगातील क्रमांक 1 च्या पॅरा आर्चर,विश्वविजेत्या आणि अर्जुन पुरस्कार विजेता शीतल देवी यांची ब्रँड ॲम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या सहकार्याअंतर्गत प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी या कंपनीच्या जागतिक ध्येयाशी सुसंगत अशा उद्देश केंद्रित विपणन मोहिमा,सर्वसमावेशकता उपक्रम आणि सामाजिक प्रभाव साधणाऱ्या संवादासाठी ह्युंदाई शीतल देवी यांच्याशी सहयोग करेल.


