पुणेकर नागरिकांना सुट्टीच्या काळात खरेदी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल सेन्ट्रल पार्क प्रांगण, आपटे रोड, डेक्कन जिमखाना येथे. शुक्रवार दि. ५ ते रविवार दि. ७ एप्रिल असे ३ दिवस खरेदी महोत्सव व खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये ६० हून अधिक स्टॉल असेल त्यामध्ये साडी, ड्रेस मटेरियल्स, बँग्ज, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, कॉस्मेटीकस, परफ्यूम्स, आयुर्वेदक औषधे, तेले, कोकण प्रॉडक्टस, विदर्भ मसाले, मुखवास, चटण्या, केक आणि हस्तकला साहित्य यांचे प्रदर्शन व विक्री असेल. खाद्यपदार्थां मध्ये उकडीचे मोदक, कैरीची डाळ व पन्हे, सरबत, सोलकढी, पराठे तसेच विविध महाराष्ट्रीयन पदार्थ यांची मेजवानी पुणेकरांना मिळेल. रोज सकाळी ११ ते रात्री ९ या काळात प्रदर्शन व विक्री चालू राहील. दि. ९ एप्रिल रोजी असणाऱ्या पाडवा सणानिमित्त याचे अयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून यातील ५ स्टाँल अपंग, अंध, आणि वयस्करांना मदत करणाऱ्या संस्था संयोजकांतर्फे देण्यात आले आहे. परगावहून ही महिलांचे गट यात सहभागी झाले असून दर्जेदार उत्पादने तुलनेने कमी दरात येथे उपलब्ध असतील. याचे उद्घाटन दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे. महाराष्ट्र चित्पावन संघाच्या महिला मंच तर्फे याचे केले आयोजन आहे. मेट्रोजेनिक्स एक्स्पो हे सह.संयोजक असणार आहेत. प्रवेशमूल्य नाही.


