जिओ स्टुडिओज प्रेझेंटेशन आणि जार पिक्चर्स प्रॉडक्शन’चा ‘वेटिंग है’ 16 सप्टेंबर 2026 पासून प्राईम व्हीडिओवर विनामूल्य स्ट्रीम ~
ट्रेलर लिंक – https://youtu.be/0o1BC2Cavxc
मुंबई, भारत – 11 सप्टेंबर 2026: प्रतीक्षा यादीत खोळंबून ‘कंफर्म तिकीट’साठी नकार मिळाल्याने येणारी निराशा प्रत्येक भारतीय प्रवाशाने कधीतरी अनुभवली आहे. परंतु एखाद्याला, कुठला तरी ‘मध्यम-मार्ग’ सापडतो – ती ‘युक्ती’ अखेरीस देशव्यापी घोटाळा बनली तर? खास ओरिजिनल्ससाठी भारतातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा असलेल्या प्राईम व्हीडिओने आज त्यांच्या आगामी एमएक्स ओरिजिनल ‘वेटिंग है’ या एका विचित्र, घोटाळा नाटकाच्या ट्रेलरचे अनावरण केले. आपल्या सर्वांना परिचित असलेली ‘तिकीट बुकिंग’ची डोकेदुखी आणि तिचे उंदीर-मांजराच्या खेळात झालेले रुपांतर हा मूळ गाभा आहे. पाटणा येथे घडणाऱ्या या मालिकेत दिव्येंदु आणि भुवन अरोरा समोरासमोर उभे राहतात. जिथे एका चतुर ‘हॅक’ची कल्पना कोणीही करू शकत नाही. पुढे जाऊन ही जोखीम अतिशय मोठी होती. जिओ स्टुडिओ प्रेझेंटेशन आणि जार पिक्चर्स प्रॉडक्शनची ही सिरीज राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आणि मालिका दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केली आहे. यात हर्षिता गौर, कुमुद मिश्रा, विजय मौर्य, सृष्टि तारे आणि सुनीता राजवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ज्योती देशपांडे आणि अजय राय निर्मित ‘वेटिंग है’ मध्ये घोटाळ्याच्या शैलीला एक विशिष्ट देशी वळण लावले आहे. या सिरीजचे कथासूत्र रेल्वे तिकीट आरक्षणाच्या जगात विनोद आणि भावनांचा वेध घेते.
ट्रेलरमध्ये सुगम मिश्रा प्रेक्षकांसमोर येतो. ज्याची भूमिका दिव्येंदु यांनी रेल्वे कॉन्स्टेबलच्या रूपात साकारली आहे. हा सुगम मिश्रा एका आव्हानात्मक नवीन नोकरीमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक हाताळायला कठीण, नवीन बॉससमवेत जुळवून घेताना दिव्येंदुने साकारलेली ही व्यक्तिरेखा घरातील गोंधळाला देखील सामोरे जात आहे. दुसऱ्या बाजूला अफरोज हमसा हे पात्र आहे. ज्याची भूमिका भुवन अरोरा याने साकारली आहे. हा अफरोज एक तंत्रज्ञ आहे आणि व्यवस्थेतून मार्ग शोधतो. लवकरच, दोघेही खेळाच्या विरुद्ध बाजूना उभे राहतात आणि हे त्यांच्याही नकळत घडते. रेल्वे तिकिटे काही सेकंदात नाहीशी होत असताना आणि एजंटची गर्दी कमी होत असताना, सुगमला संशय येऊ लागतो की व्यवस्थेत कुठेतरी पाणी मुरते आहे. सुगम हा त्याची पत्नी प्रिन्सी (जिची भूमिका हर्षिता गौरने साकारली आहे) परिस्थितीच्या आणखी खोलवर जाण्यास प्रवृत्त करत असताना अफरोजचा माग काढायला सुरुवात करतो. सुगम हा सत्याच्या जितका जवळ येऊन पोहोचतो, तितकेच अफरोजला पकडणे कठीण होऊन बसते. एका क्षणी सुगमला वाटते की शेवटी त्याच्या हातात नियंत्रण आले आहे, तेव्हा बुकिंग विंडो उघडल्यानंतर काही सेकंदातच रेल्वे तिकिटं ‘कंफर्म’ होत असल्याचे त्याच्या लक्षात येते. ज्यामुळे तो पुढील तपास करण्यास प्रवृत्त होतो. आता प्रश्न असा आहे की- हे रॅकेट किती खोलवर रुतले आहे आणि प्रत्यक्षात त्याची सूत्र कोणाच्या हातात आहेत?
या मालिकेबद्दल बोलताना, प्राईम व्हीडिओ इंडियाचे एव्हीओडी कंटेंटचे डायरेक्टर आणि हेड अमोघ दुसाद म्हणाले, “आम्ही प्राईम व्हीडिओमध्ये, नेहमीच प्रेक्षकांसमोर परिचित जगात घेऊन जाणाऱ्या कथा मांडतो. आमचे सादरीकरण देखील ताज्या स्वरुपात आणि मनोरंजक मार्गांनी करतो. रेल्वेचे तिकीट मिळवण्याचा दैनंदिन संघर्ष आणि त्याभोवती फिरणारी संपूर्ण घोटाळ्याची कथा म्हणजे ‘वेटिंग है’! हा घोटाळा किती खोलवर रुतलेला आहे, त्या गोष्टीमुळे ही मालिका विशेष बनते असं मला वाटते. जरी सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण असले तरी त्यात विनोद, भावना आणि पात्र प्रेक्षक पसंतीला उतरू शकतील. समीर विद्वांस यांचे विशिष्ट कथाकथन आणि दिव्येंदु तसेच भुवन अरोरा यांच्या नेतृत्वाखालील एक अभूतपूर्व टीम जमून आली आहे. ‘वेटिंग है’ प्रेक्षकांना आपलीशी वाटेल, हा विश्वास आम्हाला वाटतो.”
सुगम मिश्राच्या भूमिकेबद्दल बोलताना दिव्येंदु यांनी विचार मांडले, “सुगम हा काही सामान्य पोलिस नाही, या गोष्टीने मला व्यक्तिरेखेकडे आकर्षित केले. सुगम नीट तपास करून धागेदोरे शोधून काढतो. तो त्याच्या वैयक्तिक आणि नवविवाहित जीवनातील वास्तवांना सामोरा जाताना व्यावसायिकदृष्ट्या स्वत:चे पाय नीट रोवण्यासाठी प्रयत्नशील असतो. हा समतोल साधणारी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी वाटेल. मला या भूमिकेची ती बाजू साकारताना मजा आली. वेटिंग है’मध्ये जमिनीशी नाळ जोडणारा, देशी विनोद आहे. परंतु त्याच्या मुळाशी उंदीर-मांजराचा पाठलाग देखील आहे. सुगमची भूमिका साकारताना आनंद झाला आणि प्रेक्षकांना एका मोठ्या घोटाळ्याचे बिंग फुटलेले पाहून खूप मजा येईल, असं मनोमन वाटते.”
अफरोज हमसा हे पात्र साकारलेल्या भुवन अरोराने स्वत:चा अनुभव कथन करताना सांगितले की, “एक अभिनेता आणि एक व्यक्ती म्हणून अफरोज माझ्यापेक्षा किती वेगळा आहे, ही गोष्ट मला या पात्राकडे आकर्षित करते. तो एक चांगल्या अंतःकरणाचा माणूस आहे. परंतु तो कायमच अयोग्य गोष्टींच्या शोधात दिसतो. या विरोधाभासाचे सूत्र अभिनयात पेरताना मला फार आनंद झाला. मामाजी (विजय मौर्यने साकारलेले) सोबतचे त्याचे समीकरण हा त्या पात्राचा आणखी एक पैलू होता. मला खरोखर मजा आली. या पटकथेने मला लगेच आकर्षित केले. कारण प्रेक्षक सहसा जे पाहतात त्यापेक्षा खूप वेगळ्या जगात मांडण्यात आलेला हा एक मजेदार उंदीर-मांजराचा पाठलाग आहे. ही कथा ढोबळपणे वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे हे जाणून घेतल्याने ती माझ्यासाठी अधिकच रंजक ठरली. अर्थातच प्रतिभावान आणि अनुभवी अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी म्हणजे माझ्यादृष्टीने एक अतिरिक्त बोनस होता. अफरोजच्या प्रवासात अनेक अनपेक्षित वळणे आली आणि मी ते पात्र साकारताना प्रत्येक क्षणाचा खरोखर आनंद घेतला.”
वेटिंग है’बद्दल बोलताना, मालिकेचे दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले, “मला नेहमीच अशा कथांमध्ये रस वाटतो, ज्या दैनंदिन जीवनात रुजलेल्या आहेत तरीही पृष्ठभागाखाली एक मोठे जग प्रकट करतात. ‘वेटिंग है’ ने ती दुर्मीळ संधी दिली. ज्यात एक असामान्य आधार आणि अनेक पदर असलेली पात्रे एकत्र आणली. तणाव आणि कारस्थानासह विनोद संतुलित केला गेला. जिओ स्टुडिओज आणि जार पिक्चर्ससह प्राईम व्हिडिओच्या सहकार्याने आम्हाला कथेच्या केंद्रस्थानी सत्यता टिकवून ठेवून हे जग मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आणण्यास सक्षम केले आहे. प्रेक्षकांना हे जग आणि त्यात उलगडणाऱ्या अनेक पदरांचा उलगडा करण्यात आनंद होईल ही आशा वाटते.”
सुगम मिश्रा हा तपासाच्या जवळ येत असताना आणि अग्रस्थानी राहण्यासाठी अफरोजचा संघर्ष सुरू असताना, वेटिंग है रोजच्या सर्व-परिचित संघर्षातून निर्माण झालेल्या वेडेपणाच्या पाठलागात तंत्रज्ञान, जुगाड आणि शुद्ध देसी चातुर्य एकत्र आणते. विनोद, गोंधळ आणि रहस्य यांचे मिश्रण असलेले एमएक्स ओरिजिनल तिकीटासाठी सुरू असलेल्या शर्यतीचे अशा खेळात रूपांतर करते जिथे एक डाव सर्वकाही बदलू शकतो. एमएक्स ओरिजिनलवर दिनांक 16 सप्टेंबर 2026 पासून प्राईम व्हिडिओवर आणि एमएक्स प्लेयर अँड्रॉइड अॅपवर विशेष तसेच विनामूल्य स्ट्रीम होईल. प्राईम व्हीडिओद्वारे एमएक्स प्लेयर, भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा, मोबाईल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राईम व्हिडिओ आणि फायर टीव्ही
वर उपलब्ध आहे.


