Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorized*गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती...

*गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम*

 

 

 

पुणे, दि. ११: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” या संकल्पनेला चालना देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” अभियानास बळकटी देण्यासाठी सर्व संबंधित विभाग, संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले.

 

 

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री पाटील, भाई प्रतिष्ठानचे डॉ. शंतनु जगदाळे, लखन वाघमारे, जिजाऊ फाऊंडेशनच्या ज्योती ढमाळ तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

 

 

युवकांमध्ये तंबाखू व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समन्वित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी पोस्टर अभियान, जनजागृती फलक, घोषवाक्ये, बॅनर्स तसेच “तंबाखूमुक्त पुणे – व्यसनमुक्त पुणे” या संदेशाचा व्यापक प्रसार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था व युवकांच्या माध्यमातून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले.

 

 

या उपक्रमामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी ओळखपत्रे (Identity Cards) उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यानुसार, जिल्हा रुग्णालयाकडून उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक व प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्रे प्रदान करण्यात येतील, असे बैठकीत ठरविण्यात आले.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments