Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम*

गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम*

 

 

पुणे, दि. ११ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी प्रवाशांकडून खासगी बसमालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याकडून शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसचालक- मालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सध्याचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाने त्या संवर्गाच्या बससाठी येणाऱ्या भाड्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकिटाच्या दराच्या दीडपटपेक्षा जादा भाडे आकारण्यात येऊ नये. खासगी बसमालक व चालकांनी वाहनाची कागदपत्रे वैध असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

 

प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्यास किंवा प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणी आल्यास प्रवाशांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, तिकिटाचे छायाचित्र यासह ८२७५३३०१०१ या संपर्क क्रमांकावर अथवा mh12prosecution.rtopune@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असेही कळविण्यात आले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments