पुणे, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून निवड होणाऱ्या ‘लिपिक-टंकलेखक’ संवर्गातील नोंदणी व मुद्रांक विभागातील उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील या संवर्गातील रिक्त पदांवर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक १२४/२०२५ नुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, तसेच जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ अन्वये महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेण्यात आली आहे.
या परीक्षेद्वारे ‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना केवळ एका विशिष्ट विभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील संबंधित संवर्गाच्या रिक्त पदांवर नियुक्ती मिळू शकणार आहे. त्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांना राज्यातील विविध ठिकाणी कार्य करण्याची संधी उपलब्ध राहणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाने स्पष्ट केले आहे.
‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी परीक्षा देणाऱ्या तसेच निवड होणाऱ्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत करण्यात आले आहे.


