Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorized'दगडूशेठ' गणपती उत्सवातील प्रेम मंदिराची १०० फूट उंच प्रतिकृती विश्वविक्रमात* विनर्स...

‘दगडूशेठ’ गणपती उत्सवातील प्रेम मंदिराची १०० फूट उंच प्रतिकृती विश्वविक्रमात* विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये भव्य प्रतिकृतीची नोंद

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या वृंदावन येथील प्रसिद्ध शुभ्र संगमरवरी प्रेम मंदिराच्या १०० फूट उंच भव्य प्रतिकृतीची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. गणेशोत्सवातील ही भव्य प्रतिकृती भाविक आणि पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

 

मूळ प्रेम मंदिराच्या सुंदर वास्तुरचनेची झलक या प्रतिकृतीत साकारण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या चेअरमन आणि मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा केली.

 

विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र मंडळाचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, डॉ. ईशा अगरवाल तसेच विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे संस्थापक-अध्यक्ष आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया चे ध्यान प्रशिक्षक, १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments