पुणे,4 एप्रिल 2024 : इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) तर्फे नुकतेच वाकड येथील हॉटेल टीपटॉप इंटरनॅशनल येथे दोन दिवसीय पुणे डेंटल शो 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यसभेच्या संसद सदस्या व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.यावेळी इंडियन डेंटल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रविंद्रनाथ एम, राष्ट्रीय मानद सचिव अशोक ढोबळे, आयडीए महाराष्ट्रचे संचालक डॉ.विष्णू भंडारी, आयडीए महाराष्ट्रचे मानद सचिव डॉ.विकास पाटील,पुणे डेंटल शोच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन बर्वे आणि आयोजन समितीचे सचिव डॉ.अजित कदम ,उडानच्या अध्यक्षा डॉ.भक्ती दातार, दंतवैद्यकीयशास्त्र चर्चासत्र अध्यक्ष डॉ. समीर पाटील, डॉ. स्मिता आठवले, डॉ. अर्चना जोशी, डॉ. शीतल पोतनीस, वूमन डेंटल कॉन्सिलच्या डॉ. मंजिरी जोशी, डॉ. सुजाता जोशी , डॉ. मोनीका दहीवलकर, डॅा. बालाजी सदाफुले ,तसेच दंतवैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाअतंर्गत इंडियन डेंटल असोसिएशनच्या वुमेन्स डेंटल कौन्सिल तर्फे आणि अभया व ग्रुप फार्मास्युटिकल्स लि.यांच्या सहयोगाने महिलांचे मौखिक आरोग्य या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून आयसीएमआर- राष्ट्रीय एडस् संशोधन संस्था आरोग्य संशोधन विभाग (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय) च्या संचालिका डॉ.शीला गोडबोले आल्या होत्या.
यावेळी संवाद साधताना डॉ. नितीन बर्वे यांनी दातांची निगा राखणं सर्वांगीण आरोग्यासाठी कसे महत्त्वाचं आहे यावर विशेष भर दिला. जगभर मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी असे उपक्रम राबविले जात आहेत. पुणे डेंन्टल शो च्या यशामध्ये डाॅ. अजित कदम व इतर सर्वच सहकार्यांची विशेष मदत झाली असेही त्यांनी सांगितले.
या दोन दिवसीय कार्यक्रमात दंत चिकित्सेमधील नवीन तंत्र व तंत्रज्ञान,ऑटिझम व दंतचिकित्सा,वेदनाविरहित दंतचिकित्सा,मॅक्सिलोफेशियल विकारांच्या व्यवस्थापनामध्ये दंतचिकित्सकांची भूमिका,गुंतागुंतीच्या स्थितींचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर विविध विषयांवर तज्ञांद्वारे कार्यशाळा घेण्यात आल्या.या परिषदेमध्ये सुमारे ५००० दंतचिकित्सक सहभागी झाले होते.पुणे डेंटल शो मध्ये परिषदेव्यतिरिक्त प्रदर्शन,विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा यासारखे विविध उपक्रम देखील समाविष्ट होते
.


