Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोला इंडियाने महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये आणला रिफ्रेशमेंट आणि अद्वितीय उत्सवी ब्रँड...

कोका-कोला इंडियाने महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये आणला रिफ्रेशमेंट आणि अद्वितीय उत्सवी ब्रँड अनुभव

राष्ट्रीय, सप्टेंबर १८, २०२६: यंदा सणासुदीच्या हंगामात कोका-कोला इंडिया ग्राहकांचा उत्सवी अनुभव अधिक उत्साहवर्धक करणाऱ्या प्रसंगांसाठी रिफ्रेशमेंट आणि हायड्रेशन उपलब्ध करून देत आपला वैविध्यपूर्ण पेय पोर्टफोलिओ ग्राहकांच्या अधिक जवळ आणत आहे. महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये आपल्या उपस्थितीचा विस्तार करत कंपनी उत्साहपूर्ण गणेशोत्सव मंडळे, आजूबाजूच्या गृहनिर्माण सोसायट्या आणि प्रवासादरम्यान महत्त्वाच्या ठिकाणांवरून आगळेवेगळे ब्रँड अनुभव सादर करून स्थानिक समुदायांशी जोडली जात आहे. अनेक स्थानिक स्टोअर्सवर ग्राहकांची आवडती पेये सहज उपलब्ध करून देत कोका-कोला सणांच्या काळात मित्र-परिवारासोबत आनंदाचे क्षण साजरे करणे अधिक सुलभ बनवत आहे.

 

माझा सोसायटी आनंदोत्सवाच्या माध्यमातून माझा या भागातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगळावेगळा सामुदायिक अनुभव घेऊन येणार आहे. यामध्ये विजेत्या सोसायट्यांना आकर्षक बक्षिसे आणि ब्रँड अॅम्बेसेडर रितेश व जिनिलिया यांना प्रत्यक्ष भेटण्याची खास संधी मिळेल.

 

लोकांपर्यंत रिफ्रेशमेंट पोहोचवण्यासाठी, ‘कोक ऑन व्हील्स’ गजबजलेल्या उत्सवी ठिकाणांवर आणि वर्दळीच्या प्रवासाच्या मार्गांवर ग्राहकांसाठी थंडगार पेये उपलब्ध करून देईल. सणासुदीच्या काळातील दैनंदिन भोजनाचा आनंद आणखी उत्साहवर्धक करण्यासाठी, कोका-कोला लोकप्रिय स्थानिक खाद्यगृहे आणि फूड हब्ससोबत सहयोग करून विशेष मील कॉम्बो देखील देत आहे. मित्र आणि कुटुंबासोबत आपल्या आवडत्या उत्सवी भोजनाचा आस्वाद घेताना “कोकसोबत आहाहा!” क्षण अनुभवणे अधिक सोपे व्हावे, या उद्देशाने हे कॉम्बो डिझाइन करण्यात आले आहेत.

 

स्प्राइट आपल्या स्प्राइट X स्पायसी अनुभवासह विविध मंडळांमध्ये दाखल होणार आहे. तसेच हा ब्रँड स्प्राइट X स्पायसी पंडाल ट्रेलच्या माध्यमातून सणासुदीच्या काळातील ग्राहकांच्या प्रवासात स्वतःला सामावून घेत आहे. या उपक्रमात ग्राहकांना विविध मंडळांना भेट देण्याचे आणि मसालेदार (स्पायसी) खाद्यपदार्थांच्या आव्हानांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येईल, ज्यामध्ये स्प्राइट X स्पायसी स्टॅम्प बुकद्वारे हा ट्रेल पूर्ण करत असताना स्टॅम्प गोळा करता येतील आणि आकर्षक स्प्राइट मर्चेंडाईज अनलॉक करता येतील. तीन स्टॅम्प गोळा करणाऱ्या ग्राहकांना कोरियाकरिता ट्रिप जिंकण्याची संधी देणाऱ्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येईल, ज्यामुळे या उत्सवी फूड प्रवासात आणखी वेगळा उत्साह निर्माण होईल.

 

किन्ले सणासुदीच्या काळात शहराची गती सुरळीत ठेवणाऱ्या घटकांच्या हायड्रेशनवर विशेष भर देणार आहे. रस्त्यांवर दीर्घकाळ कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होईल याची खात्री किन्ले करणार आहे. या काळजीच्या भावनेला पुढे नेत, हा ब्रँड वाहतूक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष उत्सवी सोहळ्यासाठी एकत्र आणणार आहे, पारंपरिक अनुभवांनी सजवलेल्या खास सरप्राईज मंडळ भेटीने याचा समारोप होईल. हा उत्सवी उत्साह किन्लेच्या पॅकेजिंगवरही दिसून येईल, जिथे ब्रँडच्या उपस्थितीला उत्सवी रंगत देणारे विशेष फेस्टिव्ह लेबल्स जोडले गेले आहेत.

 

मिनिट मेड सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या मंडळ परिसरांमध्ये ऑन-द-गो सॅम्पलिंगच्या माध्यमातून रिफ्रेशिंग फ्रूट बेव्हरेजेस् ग्राहकांच्या अधिक जवळ आणणार आहे. हा उपक्रम ग्राहकांना निंबू फ्रेश, मिक्स्ड फ्रूट आणि अॅपल यांसारख्या त्यांच्या आवडत्या पेयांचा आस्वाद घेण्याची संधी देईल, ज्यामुळे सणांच्या काळात व्यापक ग्राहक वर्गापर्यंत पोहोचून त्यांना उत्सवामध्ये रिफ्रेशमेंटचा आनंद मिळेल.

 

कोका-कोला इंडिया आणि साऊथ-वेस्ट एशियाच्या मार्केटिंगच्या उपाध्यक्षा ग्रीष्मा सिंग म्हणाल्या, “सण म्हणजे कुटुंबे आणि समुदायांनी एकत्र येण्याची, परंपरा साजरी करण्याची, खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची आणि आनंदाचे क्षण निर्माण करण्याची वेळ असते. आमच्या वैविध्यपूर्ण पेय पोर्टफोलिओच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र आणि इतर भागांतील या उत्सवांचा भाग होताना आणि लोकांना एकत्र आणणाऱ्या प्रसंगांना रिफ्रेशमेंट व आगळेवेगळे अनुभव देताना अत्यंत आनंद होत आहे. स्थानिक सोसायट्यांचे उत्सव आणि सार्वजनिक मंडळांपासून ते कुटुंब व मित्रांसोबत जेवणापर्यंत आणि प्रवासादरम्यानच्या क्षणांपर्यंत, लोकांच्या उत्सवाच्या प्रत्येक पद्धतीला पूरक ठरावे आणि या सणांच्या आनंदाला व एकोप्याला अधिक दृढता मिळावी अशा पद्धतीने आमचा पोर्टफोलिओ डिझाइन करण्यात आला आहे.”

 

हा विस्तारित उपक्रम सणासुदीच्या हंगामात वेगवेगळ्या प्रसंगांनुसार कोका-कोला इंडियाचा पोर्टफोलिओ ग्राहकांपर्यंत पोहोचवेल, तसेच महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये पेयांची उपलब्धता अधिक दृढ करेल. गृहनिर्माण सोसायट्या, रिटेल आऊटलेट्स, फूड क्लस्टर्स, गणेशोत्सव मंडळे आणि प्रवासादरम्यान विविध ठिकाणांवर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांद्वारे हा फेस्टिव्हल प्रोग्राम अनेक ब्रँड्स आणि ग्राहकांच्या विविध प्रसंगांना एकाच व्यासपीठावर

एकत्र आणतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments