Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेट्रोल पंपांवर UPI-द्वारे ₹2,000 पेक्षा अधिक किमतीच्या इंधन खरेदीवर केवळ ₹5 इतका...

पेट्रोल पंपांवर UPI-द्वारे ₹2,000 पेक्षा अधिक किमतीच्या इंधन खरेदीवर केवळ ₹5 इतका सवलतीचा MDR

 

 

पेट्रोल पंप चालकांना कमी आणि निश्चित खर्चात UPI पेमेंट स्वीकारता यावे, यासाठी इंधन खरेदीसाठी विशेष सवलतीची MDR रचना लागू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वॉलेटसारख्या इतर पेमेंट माध्यमांवर लागू होणाऱ्या शुल्काच्या तुलनेत हे शुल्क लक्षणीयरीत्या कमी आहे.

 

ग्राहकांनी काय जाणून घ्यावे

UPIद्वारे पेमेंट करणे ग्राहकांसाठी यापुढेही मोफत राहणार आहे.

ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या इंधनाचीच किंमत अदा करावी लागेल.

 

 

पेट्रोल पंप चालकांनी काय जाणून घ्यावे

₹2,000 पर्यंतच्या इंधन पेमेंटवर MDR नाही

ग्राहकाने UPIद्वारे ₹2,000 पर्यंतचे पेमेंट केल्यास MDR शून्य असेल आणि या व्यवहारांवर पेट्रोल पंप चालकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

₹2,000 पेक्षा अधिक इंधन पेमेंटवर केवळ ₹5 MDR

₹2,000 पेक्षा अधिक किमतीच्या इंधन पेमेंटसाठी पेट्रोल पंप चालकांना प्रति व्यवहार ₹5 इतका निश्चित MDR द्यावा लागेल.

बिलाची रक्कम कितीही मोठी असली तरी हे शुल्क समान राहील.

इंधनाचे बिल ₹2,500, ₹5,000 किंवा ₹10,000 असले, तरी MDR केवळ ₹5 इतकाच राहील.

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वॉलेटवर सामान्यतः आकारल्या जाणाऱ्या शुल्काच्या तुलनेत हा

खर्च कमी आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments