Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकसंवाद-२०२६' अंतर्गत गणेशोत्सवात महिला व बालकांसाठीच्या योजनांची जनजागृती*

लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेशोत्सवात महिला व बालकांसाठीच्या योजनांची जनजागृती*

 

 

पुणे, दि. २२ : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बाल संगोपन योजना, बालगृहे आणि अनुरक्षण गृहे, अनाथ मुलांसाठी असलेल्या योजना आदींसह महिलांसाठीच्या वन स्टॉप सेंटर, महिला राज्य गृह, समुपदेशन केंद्र आदी योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय पुणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. २१) फुरसुंगी ता. हवेली येथील कामठे तरुण गणेश मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.

 

यावेळी संरक्षण अधिकारी कविता चौरे, अच्युत शेवाळे यांनी योजनांची माहिती दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांसाठीच्या योजना, महिलांसाठीच्या योजना तसेच मिशन शक्ती हे अभियान, महिलांना तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक ११२,१०९१, १००, १०९८ ची माहिती देण्यात आली. महिलासाठी अस्तित्वात असलेला कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध कायदा अर्थात पॉश अधिनियम, बालविवाह कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, गर्भलिंग निदान विरोधी कायदा आदींबाबत माहिती देण्यात आली.

 

याप्रसंगी विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक सचिन गाढवे, लिपिक सुजित भिसे, गणेश मंडळाचे पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments