Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती* ...

लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती* *न्यूक्लिअस बजेट, ठक्करबाप्पा, घरकुल तसेच जातीचे व पेसा दाखल्याबाबत जनजागृती*

 

 

पुणे, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील इंदिरानगर, शिनोली येथील गणराज ग्रुपमध्ये कातकरी बांधवांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

 

आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक सम्यक ढवळे, अजय परदेशी आणि छाया ढुमणे यांनी उपस्थितांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये न्यूक्लिअस बजेट योजना, ठक्करबाप्पा योजना, घरकुल योजना तसेच पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

कातकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तसेच जातीचा दाखला मिळविण्याची प्रक्रिया आणि पेसा दाखल्याबाबतही माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

या कार्यक्रमास अनिल पवार, रवि पवार, कमल हिलम, सुनिल वाघ, कुंडलीक वळवी, सागर जाधव, रविंद्र वळवी, जाईबाई रण, सुनिता चौरे, सुमण रण, अंकुश रण, सुलाबाई मुकणे यांच्यासह इतर कातकरी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments