Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ह्युंदाई बेयॉनसाठी बुकिंगच्या शुभारंभाची घोषणा - इंटेलिजन्स दॅट...

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ह्युंदाई बेयॉनसाठी बुकिंगच्या शुभारंभाची घोषणा – इंटेलिजन्स दॅट मूव्हज

 

 

गुरुग्राम | सप्टेंबर २३, २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आज आपली आगामी इंटेलिजंट युटिलिटी वेईकल ह्युंदाई बेयॉनसाठी बुकिंग सुरू झाल्याची घोषणा केली. ही तंत्रज्ञानाधारित एसयूव्ही नाविन्यता, शैली, प्रगत सुरक्षितता आणि भविष्यवेधी गतीशीलतेचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ह्युंदाई बेयॉनमधील इन-बिल्ट जनरेटिव्ह एआय व्हॉइस असिस्टंट इंटेलिजंट मोबिलिटी अनुभव प्रदान करतो, ज्यामुळे ड्रायव्हर आणि वेईकलमधील संवाद अधिक स्वाभाविक आणि सुलभ होतो.

 

भारतातील ह्युंदाई बेयॉन पाच प्रमुख स्तंभांवर डिझाइन करण्यात आली आहे:

 

इंटेलिजन्स ऑन – कनेक्टेड मोबिलिटी अनुभवासाठी इन-बिल्ट जनरेटिव्ह एआय व्हॉइस असिस्टंट

 

सेफ्टी ऑन – ग्लोबल के एनहान्सड प्लॅटफॉर्मवर निर्मित, ५-स्टार इंडियन सेफ्टी मानकांनुसार डिझाइन

 

कम्फर्ट ऑन – विचारपूर्वक डिझाइन केलेली सोयीस्कर आणि आरामदायी वैशिष्ट्ये

 

परफॉर्मन्स ऑन – दैनंदिन आत्मविश्वासाने भरलेल्या प्रवासासाठी डिझाइन

 

स्टाइल ऑन – जागतिक ट्रेंड्सवर आधारित प्रगतीशील एसयूव्ही डिझाइन

 

ह्युंदाई बेयॉनच्या बुकिंगची सुरुवात जाहीर करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ तरुण गर्ग म्हणाले, “ह्युंदाई मोटर इंडियामध्ये आम्ही सातत्याने अर्थपूर्ण नाविन्यतेच्या माध्यमातून गतीशीलता अनुभवांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ह्युंदाई बेयॉन प्रगत तंत्रज्ञान, भविष्यवेधी डिझाइन आणि सर्वसमावेशक सुरक्षिततेचा आकर्षक एसयूव्ही पॅकेजमध्ये उत्तम मेळ साधून आमच्या इंटेलिजंट मोबिलिटीच्या दृष्टिकोनाला मूर्त रूप देते. ह्युंदाई बेयॉन भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांना आपल्या वेईकलकडून अधिक अपेक्षा आहेत, त्या म्हणजे अधिक इंटेलिजन्स, अधिक आरामदायीपणा, अधिक आत्मविश्वास आणि अधिक शैली. ह्युंदाई बेयॉन मानवकेंद्रित तंत्रज्ञानाचा नवा आयाम सादर करते आणि खऱ्या अर्थाने स्वाभाविक गतीशीलता अनुभवाला दर्शवते. आम्हाला विश्वास आहे की, ह्युंदाई बेयॉन नवीन बेंचमार्क प्रस्थापित करेल आणि भारतातील आधुनिक ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.”

 

एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई बेयॉनचे डिझाइन कशामुळे उठून दिसते?

 

ह्युंदाई बेयॉन प्रगतीशील एसयूव्ही आहे. रस्त्यावर लक्षवेधक उपस्थिती आणि भविष्यवेधी लूक देण्यासाठी ही एसयूव्ही डिझाइन करण्यात आली आहे. या इंटेलिजंट एसयूव्हीमध्ये अॅथलेटिक प्रमाणबद्धता आणि अत्याधुनिक डिझाइन वैशिष्ट्यांचे उत्तम संयोजन आहे.

 

ह्युंदाई बेयॉनमध्ये स्कल्प्टेड बॉनेट डिझाइन, फ्युचरिस्टिक फ्रंट फॅसिआ आणि सिग्नेचर एच-एज एलईडी डीआरएल दिलेले आहेत, जे रस्त्यावर या वेईकलला आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण ओळख देतात. या वेईकलमधील रुंद एसयूव्ही लूक जिओमेट्रिक व्हील आर्चेस, रॅप-अराउंड डोअर क्लॅडिंग आणि ब्रिज-टाइप रूफ रेल्समुळे अधिक आकर्षक दिसतो. साइड प्रोफाईलपासून मागील भागापर्यंत, ह्युंदाई बेयॉनचा प्रत्येक पैलू गतीशीलता आणि आधुनिकता दर्शवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

 

ह्युंदाई बेयॉनचा आकार किती आहे आणि दैनंदिन प्रवासासाठी हा आकार का आदर्श ठरतो?

 

४.२ मीटर लांब मध्यम आकाराची एसयूव्ही ह्युंदाई बेयॉन आपल्या बाह्य रूप आणि अत्याधुनिक अंतर्गत रचनेत उत्तम समतोल साधते. एसयूव्हीचे रुंद प्रमाण रस्त्यावर वेईकलला भव्य आणि आत्मविश्वासपूर्ण लूक देते. बेयॉनमधील इंटेलिजंटली स्पेसचा वापर सर्व प्रवाशांसाठी एैसपैस लेगरूम, हेडरूम आणि शोल्डररूम उपलब्ध करून देते.

 

ह्युंदाई बेयॉनला खऱ्या अर्थाने “इंटेलिजंट युटिलिटी वेईकल” कशामुळे बनवते?

 

ह्युंदाई बेयॉन “इंटेलिजन्स दॅट मूव्हज” या विचारसरणीनुसार डिझाइन करण्यात आली आहे. इन-बिल्ट जनरेटिव्ह एआय व्हॉइस असिस्टंटसह ह्युंदाई बेयॉनमध्ये भारतातील ग्राहकांसाठी विनासायास, कनेक्टेड आणि भविष्यवेधी गतीशीलता अनुभवाकरिता प्रगत तंत्रज्ञान, कनेक्टेड सुविधा आणि सुरक्षिततता आहे. ड्रायव्हिंग अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सहजसुलभ बनवण्यासाठी ह्युंदाई बेयॉन वेईकलचा प्रत्येक घटक डिझाइन करण्यात आला आहे.

 

ह्युंदाई बेयॉन सुरक्षिततेच्या दृष्टीने कशी आहे?

 

सुरक्षितता ह्युंदाई बेयॉनचा पायाभूत आधारस्तंभ आहे, जो या वेईकलच्या सेफ्टी ऑन कटिबद्धतेमधून अधोरेखित होतो. ग्लोबल के एनहान्सड प्लॅटफॉर्मवर निर्मित आणि ५-स्टार इंडियन सेफ्टी मानकांनुसार डिझाइन केलेली ह्युंदाई बेयॉन आधुनिक ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रवाशांचे संरक्षण, संरचनात्मक प्रबळता आणि प्रगत सुरक्षा इंजिनिअरिंगवर विशेष भर देऊन तयार करण्यात आली आहे. ह्युंदाई बेयॉनमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, जी प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान अधिक सुलभ बनवण्याबाबत ह्युंदाईची कटिबद्धता अधिक दृढ करतात.

 

ह्युंदाई बेयॉनमध्ये कोणते पॉवरट्रेन आणि ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत?

 

ह्युंदाई बेयॉनमध्ये ह्युंदाईच्या विश्वासार्ह आणि प्रमाणित पेट्रोल पॉवरट्रेनची शक्ती आहे, जी अत्यंत कार्यक्षम, प्रतिसाद देणारा आणि इंधन-बचत करणारा ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ग्राहकांच्या विविध ड्रायव्हिंग प्राधान्यांचा विचार करून मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) आणि ह्युंदाईचे स्मूद इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आयव्हीटी) हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरून प्रवास करताना असो किंवा महामार्गावर क्रूझिंग करायचे असो, आरामदायी आणि सुलभ प्रवासाची खात्री मिळते.

 

ह्युंदाई बेयॉनचे बुकिंग कसे करता येऊ शकते?

 

ग्राहक ह्युंदाईच्या अधिकृत वेबसाइटवर (hyundai.co.in) ऑनलाइन पद्धतीने किंवा कोणत्याही अधिकृत ह्युंदाई डीलरशिपवर जाऊन ११,००० रुपये या बुकिंग रकमेसह ह्युंदाई बेयॉनचे बुकिंग करू शकतात. आगामी सणासुदीच्या काळात ही वेईकल बाजारपेठेत येत असून ह्युंदाई बेयॉनच्या डिलिव्ह

रीची वेळ लाँचच्या वेळी जाहीर केली जाईल.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments