पुणे, दि. २४ : प्रादेशिक परिवहन कार्याrलय, पुणे येथे नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.
तसेच दुचाकी वाहन नोंदणीचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी लिलाव प्रक्रिया २८ सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात येणार आहे.
फेसलेस सेवा कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या ‘एम एच ६१ डी’ मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील. असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
०००


