Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्सव कसा साजरा करावा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मंडळांचा*

उत्सव कसा साजरा करावा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मंडळांचा*

 

 

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी ढोल ताशा महासंघ तर्फे प्रेस नोट दिली होती. त्यामध्ये *मंडळांनी मिरवणुकीत डेकोरेशन चित्ररथ करू नये असे नमूद झाले.*

सदर *बाब महासंघातर्फे अनवधानाने नमूद झाली आहे*. गणेशोत्सव हा मंडळ साजरे करतात. या विषयात ढोल ताशा पथकांनी भाष्य करण्याचा विषय येत नाही. उत्सव कसा साजरा करावा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मंडळांचा आहे.

 

*प्रेसनोट मध्ये झालेला उल्लेख अनवधानाने आणि छपाईतील चुकीमुळे झाला आहे. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ चुकीचा प्रसृत होत आहे. हा मजकूर महासंघ सशर्त मागे घेत असून चुकीचा उल्लेख झाल्यामुळे मंडळांची दिलगिरी याद्वारे सादर करीत आहोत.* सदरची प्रेसनोट ही पथकांच्या बाबतीत आचारसंहिता प्रसिद्ध करणे या उद्देशाने दिली होती. *मंडळांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा महासंघाचा कधीही हेतू नव्हता आणि नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments