Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठीच्या सक्तीपेक्षा मराठीवर भक्ती करा तंजावर येथील कविसंमेलनाचे...

मराठीच्या सक्तीपेक्षा मराठीवर भक्ती करा तंजावर येथील कविसंमेलनाचे अध्यक्ष कवी रमेश रेडेकर यांचे विचार मराठी बोलीतील कवितांचा तंजावर संमेलनात जागर

 

 

तंजावर, २७ सप्टेंबर : “मराठी समृद्ध मातृभाषा असून ती व्यवहारात, शिक्षणात आणि बोलीमध्ये वापरायलाच हवी. पण मराठीच्या सक्तीपेक्षा मराठीवर मनापासून भक्ती करा, तरच अभिजात मराठी टिकवता येईल, याबरोबर जगातल्या सर्व प्रमुख भाषेंचे ज्ञान ही आज अवगत असायला हवे,” असे विचार प्रसिद्ध कवी रमेश रेडेकर यांनी व्यक्त केले. पेथनन कलैयरंगम सभागृह, तंजावर येथे आयोजित सरफोजीराजे (द्वितीय) मराठी कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

 

यावेळी तंजावर संस्थानचे छत्रपती आबाजीराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सुप्रसिद्ध कवी सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, सुवर्णा वाघमारे, संगीता लंघे आदी यावेळी निमंत्रक कवी म्हणून उपस्थित होते.

 

कवी रमेश रेडेकर म्हणाले,”सर्व भाषेतल्या कवींनी काव्य ही प्रभावी अभिव्यक्ती जपावी. व्यवस्थेला धारेवर धरणारी जिवंत कविता असते. आज असहिष्णू व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या कवींची आणि कवितेची गरज आहे.”

 

छत्रपती आबाजीराजे भोसले म्हणाले, ” मराठीच्या बोलीतील कविता तंजावरकरांना पहिल्यांदाच ऐकायला मिळाल्या. अशी संमेलन या भागात व्हायला हवीत. यातून मराठी तमिळ चे अनुबंध घट्ट होतील.”

 

या कविसंमेलनात मराठीच्या विविध बोलीतील कवितांचा जागर झाला. वेगवेगळ्या विषयांवरील कवितांमुळे हे संमेलन ऐतहासिक ठरले. यावेळी सर्व कवींचा छत्रपती आबाजीराजेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन किशोर टिळेकर यांनी केले. सूर्यकात नामुगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments