Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन तिथीनुसार ३२६...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन तिथीनुसार ३२६ व्या जयंतीनिमित्त देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूडतर्फे कार्यक्रम

पुणे : श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड यांच्या वतीने अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त पर्वतीवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त असलेल्या अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विश्वस्त रमेश भागवत, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत उपस्थित होते.

 

विजय जोशी म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अमृत या संस्थेमार्फत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत थोरले बाजीराव पोहोचले, याचा आनंद आहे. लोकांना बाजीराव कोण होते, याची माहिती व्हावी आणि त्यांचे कर्तृत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जगन्नाथ लडकत म्हणाले , बाजीरावांच्या शब्दकोशात ‘आराम ‘ हा शब्दच नव्हता. ‘विश्रांती ‘आणि ‘भोग’ हे शब्दही त्यांच्या शब्दकोशात नव्हते. त्यांच्या शब्दकोशात ‘महापराक्रम’ हा शब्द होता. त्याचप्रमाणे जगाच्या इतिहासात बाजीराव हे अपराजित शूर योद्धा म्हणून प्रसिद्ध झाले.

 

यावेळी रमेश भागवत, सुधीर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. पुष्करसिंह पेशवा यांनी आभार मानले.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments