पुणे, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या चौकशीत ज्ञानेश्वर बबन शेळके यांचा कोळी महादेव अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात आला आहे.
समितीने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि पोलीस दक्षता पथकाच्या चौकशी अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला.
त्यानुसार जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी समितीच्या पोलीस दक्षता पथकाने श्री. शेळके यांच्याविरुद्ध पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


