पुणे :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे शनिवारपासून (दि. ३ ऑक्टोबर) तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. या संपूर्ण प्रवासादरम्यान ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील संघाच्या विविध संघटनात्मक बैठकांमध्ये सहभागी होणार असून, या काळात त्यांचा कोणताही जाहीर कार्यक्रम असणार नाही, अशी माहिती संघाच्या प्रचार विभागाकडून देण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी सरसंघचालक पुण्यातील संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या ‘मोतीबाग’ येथे दाखल होतील. त्यानंतर सोमवारपर्यंत (दि. ५ ऑक्टोबर) विविध स्तरांतील संघटनात्मक बैठकांचे सत्र पार पडेल. या बैठकांनंतर सोमवारी दुपारी ते पुढील प्रवासासाठी रवाना होतील.


