Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटरची सप्टेंबरमध्ये 28,218 युनिट्सची विक्री

टोयोटा किर्लोस्कर मोटरची सप्टेंबरमध्ये 28,218 युनिट्सची विक्री

 

बेंगळुरू, 1 ऑक्टोबर 2026: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने सप्टेंबर 2026 मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून, कंपनीने या महिन्यात एकूण 28,218 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील 25,027 युनिट्सच्या विक्रीचा, तर 3,191 युनिट्सच्या निर्यातीचा समावेश आहे.

कॅलेंडर वर्ष 2026 मधील विक्रीतील वाढ (वर्ष-दर-वर्ष)

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने कॅलेंडर वर्ष 2026 मध्ये विक्रीत वाढ नोंदवली आहे. कंपनीने आतापर्यंत एकूण 2,94,914 युनिट्सची विक्री केली असून, त्यामध्ये 8 टक्क्यांची एकूण वाढ झाली आहे. या वाढीला देशांतर्गत बाजारपेठेतील कामगिरीचा आधार मिळाला असून, देशांतर्गत बाजारपेठेत 2,69,619 युनिट्सची विक्री झाली आहे, तर 25,295 युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे.

विक्रीच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे विक्री, सेवा आणि वापरलेल्या कार व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. सबरी मनोहर म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात विविध वाहन श्रेणींमध्ये ग्राहकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला. यामागे गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता यांवर आमचा असलेला भर महत्त्वाचा ठरला आहे. सणासुदीच्या हंगामाला सुरुवात होत असताना, ग्राहकांशी अधिक दृढ संबंध निर्माण करणे, आमच्या डीलर भागीदारांसोबत जवळून काम करणे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत त्यांना अधिक चांगला मोबिलिटी अनुभव देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहो

त.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments