Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारपासून (दि.९) श्री...

सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारपासून (दि.९) श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन ; व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम

पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या सहभागाने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. ९ ते मंगळवार, दि. 23 एप्रिल २०२४ दरम्यान जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.

 

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. तसेच, सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांनी देखील उत्सवात सक्रिय सहभाग घेतला आहे. मंगळवार, दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, भजन आणि आरती होणार आहे.

 

दिनांक ९ ते २२ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे.

 

दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. डॉ.भावार्थ देखणे, आनंद पिंपळकर, डॉ.मेधा खासगीवाले, पांडुरंग बलकवडे, डॉ.संजय उपाध्ये, ह.भ.प.योगीराज महाराज पैठणकर, ह.भ.प.गुरुबाबा औसेकर, डॉ.चंद्रशेखर टिळक, शलाका गोटखिंडीकर, डॉ.अनघा भिडे, राहुल सोलापूरकर, डॉ.मालविका तांबे, दिपाली केळकर, ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

 

तसेच, दररोज रात्री ८ वाजता संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये पं.तुकाराम दैठणकर, विदूषी सानिया पाटणकर, सन्मिता धापटे/चैतन्य कुलकर्णी, अभिनेत्री गात, पं.संजय गरुड, विभावरी आपटे, पं.राहुल देशपांडे, कलापिनी कोमकली, पं.आनंद माडगूळकर, सावनी रवींद्र, गणेश भगत, शाहीर हेमंत राजे मावळे, पं.रामदास पळसुले आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जंगली महाराजांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर मंगळवार, दि.२३ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आ

ले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments