Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुवकांसाठी काहीच केले जात नाही असे चुकीचे चित्र देशात निर्माण केले जात...

युवकांसाठी काहीच केले जात नाही असे चुकीचे चित्र देशात निर्माण केले जात आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; मएसो सीनिअर कॉलेजमध्ये गुणगौरव समारंभ

पुणे : भारतामध्ये आज वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. युवकांसाठी काहीच केले जात नाही, देशात सर्व काही चुकीचे घडत आहे, असे चित्र युवकांसमोर आणले जात आहे. मात्र, तुम्ही विद्यार्थी या देशाचे भवितव्य आहात. भारत हा जगातील सर्वांत तरुण देश असून देश घडविण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एमएसो सीनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शुभारंभ आणि गुणगौरव समारंभात ते बोलत होते. मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिरच्या एमईएस सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक होते. नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष आनंदी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत यावेळी उपस्थित होते.

 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर संस्कार केले आणि राष्ट्रभक्तीचे शिक्षण दिले. या संस्थेने एका सामान्य कुटुंबातून आलेल्या मला मूल्यांची शिकवण दिली.

 

ते पुढे म्हणाले, विद्येचे माहेरघर ही पुण्याची सगळ्यात मोठी ओळख आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. देशातूनच नाही तर जगभरातून मुले येथे येऊन शिक्षण घेतात. यासाठी अनेक शिक्षण संस्था पुण्यात आहेत. त्यापैकी एक मोठी संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे. संस्थेला १६५ वर्षांची परंपरा आहे. आताच्या काळाला आवश्यक आधुनिक कोर्सेस महाविद्यालयात सुरू आहेत, असे मोहोळ म्हणाले.

 

गेल्या काही दिवसांत विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत आणि अनेक विषयांवर चर्चा होत आहे. मात्र, आज जगातील अनेक देश भारताकडे विचार करणारा आणि नेतृत्व करणारा देश म्हणून पाहत आहेत. भारत हा जगातील सर्वांत तरुण देश आहे. त्यामुळे देशातील युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही देशाचे भविष्य आहात, असेही त्यांनी सांगितले.

 

रवींद्र वैद्य म्हणाले, महाविद्यालयात पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले कौशल्याधारित शिक्षणही दिले जाते. उद्योगक्षेत्रात विद्यार्थ्यांना कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे, याचा विचार करून त्यानुसार शिक्षण दिले जाते.

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments