– अर्बन-टूरिंग अनुभवाची नव्याने व्याख्या करण्यासाठी तयार केलेली, रस्त्यावरील प्रभावी उपस्थिती आणि सुधारित परफॉर्मन्ससह
– Aprilia चे फ्लॅगशिप 175cc hp-e इंजिन, जे आपल्या सेगमेंटमधील सर्वात मोठे आहे, आणि विकसित हाय-परफॉर्मन्स 125cc hp-e इंजिन यांनी सुसज्ज नवीन SXR GT रेंज दमदार पॉवर, टॉर्क आणि ॲक्सिलरेशन देते, ज्यामुळे राइड अधिक रंजक होते.
– संपूर्ण रेंजमध्ये मोठी 14-इंच चाके, सिग्नेचर ट्रायपॉड LED हेडलॅम्प आणि प्रीमियम इटालियन डिझाइन
– प्रत्येक राइड अधिक चांगली करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, ज्यात SXR GT 175cc hp-e मध्ये 5-इंच TFT स्क्रीन आणि SXR GT 125cc मध्ये LCD क्लस्टरचा समावेश
– 125cc आणि 175cc व्हेरियंटमध्ये बोल्ड ग्राफिक्स आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या ठळक लिव्हरी
– खऱ्या आणि परिपूर्ण टूरिंग अनुभवासाठी मोठी विंडस्क्रीन, पेरिमीटर किट आणि उपयुक्त टॉप बॉक्स ॲक्सेसरीज म्हणून उपलब्ध
06 ऑक्टोबर 2026, पुणे: Aprilia India ने स्कूटरची ऑल-न्यू SXR GT रेंज सादर केली आहे. ही रेंज एका नव्या, बोल्ड युगासाठी अर्बन टूरिंगची वेगळी मांडणी घेऊन आली असून, त्यात प्रेझेन्स, परफॉर्मन्स आणि कम्फर्ट यांचा समान मेळ आहे. आपल्या राइडकडून अधिक अपेक्षा ठेवणाऱ्या रायडर्ससाठी तयार केलेली नवीन SXR GT रेंज शहरातील दैनंदिन प्रवासापासून वीकेंड गेटअवेपर्यंत सहजपणे जुळवून घेईल अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. सिटी स्कूटरची सोय आणि हायवेसाठी सज्ज मोटरसायकलची रॉ पॉवर यांमधील अंतर ही रेंज भरून काढते!
या नव्या सादरीकरणाबद्दल आपले विचार मांडताना पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि. चे चेअरमन आणि एमडी श्री. डिएगो ग्राफी म्हणाले:
“भारताच्या स्कूटर बाजारपेठेत प्रीमियमायझेशनसाठी मोठा वाव असल्याचे आम्हाला दिसते, कारण ग्राहक अधिकाधिक प्रमाणात अशा उत्पादनांच्या शोधात आहेत जी मालकीचा अधिक समृद्ध आणि वेगळा अनुभव देतात. प्रीमियम अर्बन मोबिलिटीचे भविष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यावरून नव्हे, तर लोक तो प्रवास कसा अनुभवतात यावरून ठरेल. आजच्या रायडर्सना परफॉर्मन्स, कम्फर्ट, टेक्नॉलॉजी आणि स्वतःची वेगळी ओळख या सर्व गोष्टी समान प्रमाणात हव्या आहेत. नवीन Aprilia SXR GT रेंज हाच बदल दर्शवते; ती Aprilia चा परफॉर्मन्स DNA आणि इटालियन डिझाइन यांना आधुनिक भारतीय जीवनशैलीला आवश्यक असलेल्या व्हर्सटॅलिटीची जोड देते. टू-व्हीलर क्षेत्रातील आमचे ध्येय स्पष्ट आहे: प्रस्थापित संकेतांना सातत्याने आव्हान देत राहणे आणि प्रीमियम स्कूटर सेगमेंटकडून ग्राहकांच्या अपेक्षांची कक्षा रुंदावणारी उत्पादने सादर करणे.”
प्रमुख वैशिष्ट्ये
डिझाइन: मोठा स्टान्स. प्रभावी उपस्थिती.
ऑल-न्यू Aprilia SXR GT इतरांपेक्षा वेगळी दिसावी यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. तिचा मोठा आकार, बोल्ड ग्राफिक्स आणि अर्बन-टूरिंग कॅरेक्टर या स्कूटरला रस्त्यावर प्रभावी उपस्थिती देतात आणि प्रीमियम, परफॉर्मन्स-केंद्रित उत्पादन म्हणून तिचे स्थान अधिक भक्कम करतात.
LED फ्रंट लाइट: सिग्नेचर ट्रायपॉड LED फ्रंट लाइट स्कूटरची खास Aprilia ओळख अधिक ठळक करते. शक्तिशाली LED फ्रंट लाइट्स रस्ता चांगल्या प्रकारे उजळवतात, त्यामुळे संध्याकाळी आणि रात्रीच्या राइडमध्ये आत्मविश्वास मिळतो.
ग्राफिक्स आणि कलर रेंज: लक्षवेधी बॉडी ग्राफिक्स आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या सहा लिव्हरी Aprilia SXR GT रेंजला स्वतःची वेगळी ओळख देतात. त्या या रेंजला पारंपरिक स्कूटरपेक्षा वेगळे ठरवतात आणि वेगवेगळ्या रायडर्सच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा पद्धतीने डिझाइन केल्या आहेत.
Aprilia SXR GT 125 hp-e ची विशेष लॉन्च किंमत ₹ 1,09,999 (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) आहे आणि ती रिफाइन्ड, प्रीमियम लुकसाठी सोफिस्टिकेटेड ग्राफिक्ससह तीन अनोख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Matte Black
Glossy Azzurro
Glossy White
Aprilia SXR GT 175 hp-e ची विशेष लॉन्च किंमत ₹ 1,29,999 (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) आहे आणि ती तीन एक्सक्लुझिव्ह, भावनांपासून प्रेरित रंग आणि ग्राफिक्समध्ये उपलब्ध आहे, जे वैयक्तिक ओळख दर्शवण्यासाठी आणि रस्त्यावरील तिची उपस्थिती अधिक उठावदार करण्यासाठी डिझाइन केले आहेत.
Metallic Blue
Matte Black
Matte Green
Aprilia SXR GT 175 मध्ये Aprilia च्या GT रेंजच्या शैलीवर आधारित नवीन फूटबोर्ड ग्राफिक्सही आहेत, जे या व्हिज्युअल अपडेटला पूर्णत्व देतात.
सर्वोच्च स्तरावरील परफॉर्मन्स
ऑल-न्यू SXR GT च्या केंद्रस्थानी विकसित हाय-परफॉर्मन्स एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 175cc hp-e आणि 125cc hp-e कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.
मोठे इंजिन, अधिक मोठा परफॉर्मन्स: 125cc आणि 175cc hp-e इंजिने सुधारित पॉवर आणि टॉर्क, अधिक दमदार ॲक्सिलरेशन आणि एकूणच सुधारित परफॉर्मन्स देण्यासाठी विकसित करण्यात आली आहेत. यामुळे रायडर्सना दैनंदिन रायडिंगच्या परिस्थितीत तसेच लांबच्या प्रवासातही अधिक आत्मविश्वास आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तसेच दैनंदिन राइडसाठी ग्राहकांच्या अपेक्षांनुसार फ्यूएल इकॉनॉमीही मिळते.
SXR GT चे 175cc hp-e इंजिन 7,200 rpm वर 9.76 kW पॉवर आणि 6,000 rpm वर 14.14 Nm टॉर्क निर्माण करते, तर SXR GT 125 चे 125cc hp-e इंजिन 7,400 rpm वर 7.8 kW पॉवर आणि 6,200 rpm वर 10.4 Nm टॉर्क देते. SXR GT चे परफॉर्मन्स-केंद्रित कॅरेक्टर तिच्या अर्बन-टूरिंग पोझिशनिंगला पूरक आहे; ते रायडर्सना क्रूझिंगसाठी अधिक परफॉर्मन्स देते आणि त्याच वेळी प्रीमियम स्कूटरकडून अपेक्षित असलेली व्हर्सटॅलिटी कायम ठेवते.
हे विकसित इंजिन BSVI OBD II Stage B मानकांची पूर्तता करते आणि E20 इंधनाशी सुसंगतही आहे, ज्यामुळे परफॉर्मन्स अपग्रेडला सुधारित पर्यावरणीय सुसंगततेची जोड मिळते.
14-इंच चाके: प्रत्येक प्रवासात आत्मविश्वास: या सेगमेंटमध्ये प्रथमच आलेल्या मोठ्या 14-इंच चाकांवर आधारित SXR GT चा अधिक ठाम स्टान्स तिला अधिक अचूक हँडलिंग आणि लांब अंतरावर स्मूथ, थकवा-मुक्त राइड असे दोन्ही देतो.
प्रगत तंत्रज्ञान: राइडशी जोडलेले
SXR GT 175 प्रीमियम 5-इंच TFT डिस्प्ले आणि हँडलबार कंट्रोल्समध्ये समाविष्ट केलेल्या अतिरिक्त स्विचेससह SXR GT रेंजमध्ये तंत्रज्ञानाचा नवा स्तर आणते. TFT स्क्रीन रायडिंग आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित महत्त्वाची माहिती स्पष्ट आणि आधुनिक इंटरफेसमध्ये एकत्र दाखवते. या सिस्टममध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, म्युझिक मॅनेजमेंट, कॉल मॅनेजमेंट आणि नेव्हिगेशन आहे, ज्यामुळे रायडर्स कनेक्टेड राहतात आणि राइडदरम्यान आवश्यक माहिती सहज पाहू शकतात. SXR GT 175 मध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनही आहे, जे रायडर्सना अनोळखी मार्गांवर अधिक सहजतेने मार्ग शोधण्यास मदत करते.
SXR GT 125 मध्ये 5-इंच LCD डिस्प्ले आहे.
सेफ्टी आणि कंट्रोल
SXR GT 175 hp-e च्या पुढील चाकाला ABS देण्यात आले आहे, जे तिच्या परफॉर्मन्स-केंद्रित पॅकेजमध्ये सुधारित ब्रेकिंग कंट्रोलची भर घालते. मोठी 14-इंच चाके, फ्रंट डिस्क ब्रेक आणि ABS यांचा हा मेळ रायडर्सना वेगवेगळ्या रायडिंग परिस्थितीत अधिक आत्मविश्वास देण्यासाठी डिझाइन केला आहे.
SXR GT 175 hp-e मध्ये इंटिग्रेटेड हीट प्रोटेक्शन असलेला नवीन मफलरही देण्यात आला आहे, जो स्कूटरच्या परफॉर्मन्स-केंद्रित पॅकेजमध्ये उपयुक्ततेची भर घालतो.
SXR GT 125 hp-e मध्ये 220 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 140 mm रिअर ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत, जे ऑप्टिमल ब्रेकिंग देतात.
आपल्या सर्वांगीण वैशिष्ट्यांमुळे SXR GT शहरातील राइड आणि शहराबाहेरील लांबच्या वीकेंड टूर या दोन्हींमध्ये उत्तम कामगिरी करते.
Aprilia ची वैयक्तिक अभिव्यक्ती
ऑल-न्यू SXR GT अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की रायडर्सना ही स्कूटर स्वतःच्या पसंतीनुसार घडवण्यास अधिक वाव मिळेल. नवीन कलर आणि ग्राफिक्स रेंजसोबतच Aprilia India ॲक्सेसरीजची एक मालिकाही उपलब्ध करून देणार आहे, ज्या स्कूटरचे व्हिज्युअल अपील आणि टूरिंग उपयुक्तता दोन्ही वाढवतात.
पर्यायी मॅन्युअल ॲडजस्टेबल विंडशील्ड आणि क्रॅश गार्डमुळे रायडर्स SXR GT ला आपल्या रायडिंग गरजांनुसार आणखी जुळवून घेऊ शकतात, ज्यामुळे एक व्हर्सटाइल अर्बन टूरिंग साथीदार म्हणून तिची पोझिशनिंग अधिक भक्कम होते.
SXR GT प्रीमियम रंग आणि ग्राफिक्सच्या नवीन रेंजमध्ये उपलब्ध असेल, तर निवडक टूरिंग-केंद्रित ॲक्सेसरीज स्वतंत्रपणे उपलब्ध असतील.
SPEC SHEET:
SXR GT 125 hp-e
SXR GT 175 hp-e
Engine
Single Cylinder 4 stroke, Air Cooled
Single Cylinder 4 stroke, Air Cooled
Bore X Stroke
52×58.6 mm
60×60.6 mm
Displacement
124.45 cc
174.7 cc
Max Power
7.8 kW @7400 rpm
9.76 kW @7200 rpm
Max Torque
10.4 Nm @ 6200 rpm
14.14 Nm @ 6000 rpm
Distribution
SOHC (single overhead cam), 3 valves per cylinder
SOHC (single overhead cam), 3 valves per cylinder
Fuel System
Electronic injection with throttle body, Single Injector
Electronic injection with throttle body, Single Injector
Cooling
Forced air
Forced air
Starter
Electric
Electric
Front Suspension
Telescopic front fork
Telescopic front fork
Rear Suspension
Rear suspension with Dual-Effect Hydraulic Shock Absorber With five position adjustable
Rear suspension with Dual-Effect Hydraulic Shock Absorber With five position adjustable
Front Brake
CBS – Disc brake (220 mm)
ABS – Disc brake (220 mm)
Rear Brake
140 mm Rear Drum Brake
140 mm Rea
r Drum Brake
Aprilia SXR GT चे बुकिंग भारतभरातील सर्व Aprilia डीलरशिपमध्ये सुरू आहे.


