टायटनच्या नव्या ‘ऑटोमॅटिक्स’ कलेक्शनचा पाया असलेल्या ‘7A सीरीज’मुळे मिळणार आधुनिक मेकॅनिकल डिझाईन आणि घड्याळ निर्मितीच्या अगणित संधी
राष्ट्रीय, १८ सप्टेंबर, २०२६: गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ, टायटनने केवळ घड्याळाच्या बाह्य रूपापुरते मर्यादित न राहता घड्याळ निर्मितीच्या दर्जेदार तंत्रज्ञानावर भर दिला आहे. कंपनीने प्रत्येक टप्प्यावर कलाकुसर, इंजिनिअरिंग आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर प्रगती केली आहे. यामुळे केवळ टायटनचीच नाही, तर जागतिक पातळीवर भारतीय घड्याळ उद्योगाची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. याच प्रवासात एक पाऊल पुढे टाकत, भारतातील या सर्वात प्रतिष्ठित घड्याळ उत्पादक कंपनीने आता ‘वेत्रा’ (Vetra) या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये तयार केलेल्या मेकॅनिकल यंत्रणेची घोषणा केली आहे. घड्याळ निर्मितीमधील ही आधुनिक क्रांती ‘टायटन ऑटोमॅटिक्स’ या नव्या कलेक्शनच्या माध्यमातून ग्राहकांच्या भेटीस येत आहे. ‘वेत्रा 7ए सीरीज’वर चालणाऱ्या मेकॅनिकल घड्याळांचे हे नवे कलेक्शन म्हणजेच आधुनिक घड्याळ उद्योगात टायटनने घेतलेली आणखी एक मोठी झेप आहे.
‘वेत्रा’ (Vetra) या नावाचा जन्म ‘वेद’ आणि ‘त्रा’ या दोन शब्दांच्या अर्थपूर्ण मिलापातून झाला आहे. ‘वेद’ म्हणजे काळाविषयीचा भारतीय दृष्टिकोन, ज्यानुसार काळ हे कधीही न संपणारे आणि निरंतर चालत राहणारे एक चक्र आहे; तर ‘त्रा’ म्हणजे अशी एक तांत्रिक यंत्रणा जी अमूर्त ऊर्जेला प्रत्यक्ष रूपात सादर करते. म्हणजेच, ‘वेत्रा’ हे घड्याळाचे असे एक इंजिन आहे जे साठवलेल्या ऊर्जेचे अचूक वेळेत रूपांतर करते. या माध्यमातून टायटनने घड्याळाची अप्रतिम कलाकुसर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट संगम साधला आहे. कठीण तांत्रिक आव्हानांवर अत्यंत अचूकतेने मात करण्याची टायटनची विचारसरणी यातून दिसून येते. येथे कोणताही विनाकारण बडेजाव नसून, या यंत्रणेची खरी ताकद तिच्या उत्कृष्ट कामगिरीतूनच सिद्ध होते. यातील प्रत्येक सुटा भाग एका विशिष्ट हेतूने जोडला असून, या इंजिनची प्रत्येक हालचाल अगदी विचारपूर्वक आणि दर्जेदार कामगिरी करण्यासाठीच डिझाईन केली आहे.
या लाँचिंग प्रसंगी बोलताना टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि चीफ सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसर श्री. राहुल शुक्ला म्हणाले, “आमच्या नवीन ‘ऑटोमॅटिक्स’ रेंजचा गाभा असलेली ‘वेत्रा’ (Vetra) यंत्रणा हे सिद्ध करते की, जेव्हा भारतीय घड्याळ उद्योगातील इंजिनिअरिंगची महत्त्वाकांक्षा आणि स्वतःच्या बळावर नवीन घडवण्याचा आत्मविश्वास एकत्र येतो, तेव्हा आपण काय निर्माण करू शकतो. स्वतःची मेकॅनिकल यंत्रणा तयार करणाऱ्या जगातील मोजक्या घड्याळ उत्पादक कंपन्यांच्या पंक्तीत ‘वेत्रा’मुळे टायटनचे स्थान पक्के झाले आहे. आमचे हे पाऊल भारतातील घड्याळ निर्मितीच्या मजबूत स्वदेशी व्यवस्थेला मोठी गती देईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आधुनिक घड्याळ निर्मितीच्या जागतिक नकाशावर भारताचे स्थान अधिक पक्के करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.”
टायटनच्या या नव्या मेकॅनिकल यंत्रणेची ताकद ‘टायटन ऑटोमॅटिक्स’ कलेक्शनमधील चार वेगवेगळ्या डिझाईन्समधून ग्राहकांसमोर येत आहे. ‘वेत्रा 7ए सीरीज’ ही एकाच मुख्य प्लॅटफॉर्मवरून घड्याळाची अनेक मेकॅनिकल फंक्शन्स कशी चालवता येतात, याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. यामध्ये ‘इन्फिनियम’, ‘ड्युअलिस’, ‘मिडनाईट’ आणि ‘एट्रियम’ अशा चार मॉडेलचा समावेश आहे. ही सर्व घड्याळे 316एल सर्जिकल ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आली असून, त्यांच्यावर ३-लेयर अँटी-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असलेले घुमटाकार सॅफायर क्रिस्टल ग्लास बसवले आहे. या टाईमपिसेसचा लूक अतिशय आधुनिक असून, यात सुरेख डिझाईन केलेले क्राउन गार्ड्स आणि घड्याळाच्या कडांवर सॅटीन व पॉलिश केलेल्या पृष्ठभागांचा एक सुंदर मिलाप पाहायला मिळतो. इतकेच नाही तर, रात्रीच्या वेळीही वेळ स्पष्ट दिसावी यासाठी यामध्ये उच्च दर्जाचे स्विस सुपर-ल्युमिनोव्हा वापरण्यात आले आहे, ज्यामुळे घड्याळ अंधारातही चमकते.
इन्फिनियम: ‘वेत्रा कॅलिबर 7A20+’ या इंजिनवर चालणाऱ्या ‘इन्फिनियम’ मॉडेलमध्ये तब्बल ७२ तासांचा (३ दिवस) पॉवर रिझर्व्ह मिळतो. यासाठी घड्याळातील मुख्य स्प्रिंग आणि बॅरलची रचना अतिशय प्रगत करण्यात आली आहे, ज्यामुळे एकदा घड्याळ पूर्ण वाईंड केल्यानंतर ते सलग ३ दिवस चालते. टायटनच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षमतेचा हा एक मोठा पुरावा आहे. हे घड्याळ ४० मिमीच्या केसमध्ये उपलब्ध असून, त्याचे ३डी प्रेस्ड लॅकर डायल घड्याळाला एक सुंदर खोली देते. तसेच, हिऱ्यासारखे टोकदार आणि रेखीव कट केलेले काटे वेळ अचूक आणि स्पष्टपणे दाखवतात.
ड्युअलिस: ४२ मिमी केस असलेल्या ‘ड्युअलिस’ मॉडेलमध्ये ‘7A37 वेत्रा कॅलिबर’ हे इंजिन वापरण्यात आले आहे. यामध्ये एक स्वतंत्र जीएमटी काटा आणि आतल्या बाजूला फिरणारे २४ तासांचे बेझल दिले आहे. हे ‘ड्युअल टाईम’ फिचर अशा पद्धतीने डिझाइन केले आहे की, घड्याळाच्या मुख्य वेळेत कोणताही अडथळा न आणता तुम्ही दुसऱ्या देशातील स्थानिक वेळ अगदी सहज सेट करू शकता. एकाच वेळी दोन देशांमधील वेळेवर लक्ष ठेवू इच्छिणाऱ्या किंवा सतत प्रवास करणाऱ्यांसाठी हे मॉडेल एक उत्तम सोबती आहे.
मिडनाईट: ‘वेत्रा 7A77 कॅलिबर’ या प्रगत इंजिनवर चालणाऱ्या ‘मिडनाईट’ मॉडेलमध्ये तारखेचा आकडा स्पष्ट आणि मोठा दिसण्यासाठी ‘ड्युअल डिस्क बिग डेट डिस्प्ले’ दिला आहे. ४२ मिमी केस असलेल्या या घड्याळाचे डायल एका सुंदर उभ्या पॅटर्नमध्ये डिझाइन केले असून, त्याला टोकदार आणि रेखीव काटे जोडण्यात आले आहेत. विशेषतः फॉर्मल कपड्यांवर आणि शाही समारंभांमध्ये वापरण्यासाठी एक परिपूर्ण ‘ड्रेस वॉच’ म्हणून हे मॉडेल डिझाईन केले आहे.
एट्रियम: ४२ मिमी केस असलेल्या ‘एट्रियम’ मॉडेलमध्ये सेकंदांसाठी एक वेगळे लहान डायल दिले आहे. या घड्याळाचे बेझल नक्षीदार असून त्याचा बेल्ट ड्युअल फिनिशिंगमध्ये येतो, ज्यामुळे घड्याळाला एक राजेशाही लूक मिळतो. याच्या सँडब्लास्टेड डायलवर पारंपरिक रोमन अंक अतिशय आकर्षकपणे मांडले आहेत. हे घड्याळ ‘वेत्रा इन-हाउस कॅलिबर 7ए200-सी’ या इंजिनवर चालते आणि ग्राहकांसाठी हे साध्या तसेच घड्याळाचे अंतर्गत मेकॅनिझम बाहेरून दिसणाऱ्या ‘ओपन-हार्ट’ अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
घड्याळाच्या आतील प्रगत इंजिनिअरिंग आणि त्याचे बाहेरील आकर्षक रूप यांचा हा सुंदर मिलाप टायटनची घड्याळ निर्मितीमधील सर्वोच्च क्षमता अधिक प्रगल्भ करतो. विशेष म्हणजे, प्रत्येक ‘वेत्रा’ यंत्रणा कुशल कारागीर स्वतःच्या हाताने जोडतात. तसेच, घड्याळ निर्मितीमधील ‘NF S 81-513’ आणि ‘ISO 22810’ या आंतरराष्ट्रीय मानकांवर प्रत्येक यंत्रणेची स्वतंत्रपणे चाचणी केली जाते.
या कलेक्शनमधील घड्याळांच्या किमती ₹४७,९९५ पासून ₹५४,९९५ पर्यंत आहेत. ‘टायटन ऑटोमॅटिक्स’ कलेक्शन निवडक ‘टायटन वर्ल्ड’ व ‘हेलिओस’ स्टोअर्ससह Titan.co.in या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. घड्याळाचा गाभा असलेल्या या ‘वेत्रा’ यंत्रणेसह, हे कलेक्शन घड्याळप्रेमी आणि संग्राहकांना टायटनच्या मेकॅनिकल घड्याळ निर्मितीचा एक नवा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. यामध्ये घड्याळाच्या बाहेरील रूपाइतकाच, त्याच्या आतील इंजिनचा अप्रतिम प्रवास अनुभवणे हा देखील ग्राहकांसाठी एक
सुवर्णक्षण असेल.


