Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉमनवेल्थ स्पर्धेत डॉक्टर शर्वरी इनामदार यांची नऊ सुवर्णपदकांची कमाई ...

कॉमनवेल्थ स्पर्धेत डॉक्टर शर्वरी इनामदार यांची नऊ सुवर्णपदकांची कमाई कॉमनवेल्थ रेकॉर्डसह बेस्ट लिफ्टर किताब

 

 

पुणे : विनिपेग, कॅनडा येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी भारतासाठी नऊ सुवर्णपदके व एक रजतपदक पटकावले. यासोबतच नवीन कॉमनवेल्थ रेकॉर्ड देखील नोंदविले . विविध कॉमनवेल्थ देशांमधील सुमारे ८०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

 

५७ किलो एम१ महिला गटात डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक पॉवरलिफ्टिंग प्रकारात स्क्वॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्टमध्ये मिळून एकूण ३७२.५ किलो वजन उचलत तीन सुवर्णपदके व एक रजतपदक पटकावले. इक्विप्ड पॉवरलिफ्टिंगमध्ये एकूण ४२७.५ किलो वजन उचलत नवीन कॉमनवेल्थ टोटल रेकॉर्ड नोंदविले. इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग प्रकारात भारतासाठी चार सुवर्णपदके व बेस्ट लिफ्टर कॉमनवेल्थ फर्स्ट रनर अप अशी कामगिरी केली.

 

क्लासिक बेंच प्रेस ओन्ली प्रकारात ७५ किलो, तर इक्विप्ड बेंच प्रेस प्रकारात ९५ किलो वजन उचलून दोन्ही प्रकारांतही सुवर्णपदक मिळवले. पॉवरलिफ्टिंगच्या चारही प्रकारांत भारतासाठी नऊ सुवर्णपदके व एक रजतपदक, बेस्ट लिफ्टर किताब आणि कॉमनवेल्थ रेकॉर्ड असे दमदार यश मिळवले.

 

डॉ.शर्वरी इनामदार सदाशिव पेठ येथे खेळाडूंसाठी व मेटाबोलिक डिसऑर्डरसाठी आहार आयुर्वेद नावाचे क्लिनिक चालवतात.

 

पुण्याच्याच मुक्ता फाटक यांनी ६३ किलो ओपन महिला गटात क्लासिक बेंच प्रेस प्रकारात ६५ किलो वजन उचलून पाचवा क्रमांक मिळवला. इक्विप्ड बेंच प्रेस स्पर्धेत ८७.५ किलो वजन उचलत कांस्यपदक मिळवले.

 

डॉ. शर्वरी इनामदार आणि मुक्ता फाटक या दोघीही पुण्याच्या कोड ब्रेकर जिममध्ये सराव करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments