Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांकडून  दि. २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन...

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांकडून  दि. २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

 

 

मुंबई, दि. १५ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना यंदा दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांमधील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हौशी मराठी नाट्य स्पर्धा, हौशी हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, मराठी बालनाट्य स्पर्धा, दिव्यांग बालनाट्य स्पर्धा, मराठी एकांकिका स्पर्धा तसेच मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आदी विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

 

राज्य नाट्य स्पर्धांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग व्हावा आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धेतील कलाकार व नाट्यसंस्थांना मिळावा, या उद्देशाने यंदा परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक कलाकारांना दि. २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

 

ऑनलाइन अर्ज तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी mahanatyaspardha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र व अनुभवी नाट्य कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments