पिंपरी दि. १५ ऑक्टोबर २०२६ :- भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे,उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,उपायुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव उपस्थित होते.
विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. आपल्या कार्यातून देशाला नवी दिशा देणाऱ्या थोर शास्त्रज्ञ डॉ. कलाम यांचे विचार आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.


