Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत 600 हुन अधिक...

शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत 600 हुन अधिक खेळाडू सहभागी

 

 

पुणे, 15 ऑक्टोबर 2026: शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातून 600 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 

शिवभूमी शिक्षण ट्रस्टचे संचालक, स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे यांनी सांगितले की, हि स्पर्धा फिडे, एआयसीएफ, एमसीए, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण 2,50,000/- रुपये रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

 

स्पर्धेत600 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेत आयएम सुयोग वाघ(2289), आयएम निखिल दिक्षित(2159), डब्ल्यूआयएम साक्षी चितलांगे (2075), एफएम विरेश शरणार्थी(2199), अविरत चौहान(2071), कॅडेट मास्टर श्लोक शरणार्थी(2030), अखिलेश नगारे(1979) हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेसाठी आयए राजेंद्र शिदोरे हे चीफ आरबीटर म्हणून, तर आयए श्रद्धा विंचवेकर डेप्युटी चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहे

त.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments