२०२६ च्या पहिल्या सहामाहीत, Binance च्या एआय-सहाय्यित (AI-assisted) जोखीम यंत्रणांनी ८ दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यात आणि अंदाजे ४.६ अब्ज डॉलर्स (३८,६४० कोटी रुपये) संभाव्य नुकसान रोखण्यात मदत केली.
खाते संरक्षणाचे आठ स्तर एकाच रिअल-टाइम (Real-time) प्रतिसादात काम करतात, जसे जोखमीच्या स्वरूपानुसार सतर्क करणे, पडताळणी करणे आणि हस्तक्षेप करणे, ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुरळीत राहतो आणि खाती सुरक्षित राहतात.
या यंत्रणांमागे सिक्युअर अॅसेट फंड फॉर युझर्स (Secure Asset Fund for Users – SAFU) चा आधार आहे, जो १ अब्ज डॉलर्स (८,४०० कोटी रुपये) आपत्कालीन राखीव निधी आहे, सोबत वापरकर्त्यांना स्वतःची भूमिका बजावण्यासाठी मोफत सुरक्षा शिक्षणाचे पाठबळ दिले जाते.
ऑक्टोबर , २०२६ – Binance या ट्रेडिंग व्हॉल्यूम (Trading Volume) आणि नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज (Cryptocurrency Exchange) मागील जागतिक ब्लॉकचेन (Blockchain) परिसंस्थेने जाहीर केले की, त्यांच्या एआय-सहाय्यित (AI-assisted) सुरक्षा यंत्रणांनी २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ८ दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्त्यांचे संरक्षण केले आणि अंदाजे ४.६ अब्ज डॉलर्स (अंदाजे ३८,६४० कोटी रुपये) संभाव्य नुकसान रोखले. यावरून निदर्शनास येते की, प्रगत तंत्रज्ञान क्रिप्टो-संबंधित (Crypto-related) फसवणूक आणि स्कॅम्स (Scams) विरुद्ध रिअल-टाइममध्ये (Real-time) लढा देत आहे.
संपूर्ण भारतात डिजिटल अॅसेट्स (Digital Assets) चा स्वीकार वाढत असताना क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) सुरक्षेबाबत चिंता अनेक संभाव्य गुंतवणूकदारांसाठी मुख्य अडथळा ठरत आहेत. Binance चा नवीन सुरक्षा डेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence – AI) आणि बहुस्तरीय संरक्षण यंत्रणा या चिंतांचे रिअल-टाइममध्ये (Real-time) निवारण करत आहेत यावर प्रकाश टाकतो.
Binance च्या एआयने (AI) ४.६ अब्ज डॉलर्सचे नुकसान रोखले
Binance च्या एआय-सहाय्यित (AI-assisted) जोखीम यंत्रणा रिअल-टाइममध्ये (Real-time) हालचाली तपासून पाहतात आणि अँटी-फ्रॉड (Anti-fraud) व अँटी-स्कॅम (Anti-scam) नियंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या १०० हून अधिक एआय मॉडेल्स (AI Models) च्या मदतीने वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी जोखीम ओळखून सतर्क करतात. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत, या यंत्रणांनी कोट्यवधी स्कॅम (Scam) आणि फिशिंग (Phishing) चे प्रयत्न हाणून पाडले, ४२,००० हून अधिक घातक (मॅलिशिअस – Malicious) अॅड्रेसेस (Addresses) ब्लॅकलिस्ट (Blacklist) केले आणि दररोज १४,००० हून अधिक रिअल-टाइम इशारे (Real-time Alerts) जारी केले.
ही मॉडेल्स (Models) आता रिअल-टाइम जोखमीचे ८० टक्के ते ९० टक्के निर्णय घेतात, तर सूक्ष्म पडताळणीची आवश्यकता असलेल्या केसेसमध्ये (Cases) मानवी समीक्षक हस्तक्षेप करतात. एकत्रितपणे, या उपाययोजनांनी जागतिक पातळीवर ८ दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्त्यांचे संरक्षण केले आणि जगभरात अंदाजे ४.६ अब्ज डॉलर्स (३८,६४० कोटी रुपये) संभाव्य नुकसान रोखले.
“या आकडेवारीमधून बचत सुरक्षित राहिलेल्या व्यक्ती आणि आर्थिक नुकसान टळलेल्या कुटुंबांची माहिती समोर येते,” असे Binance च्या एपीएसीचे, प्रमुख एसबी सेकर (SB Seker, Head of APAC, Binance) म्हणाले. “रोखलेले प्रत्येक नुकसान महत्त्वाचे असते, विशेषतः भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांमध्ये, जिथे क्रिप्टो (Crypto) अनेक कुटुंबांच्या बचतीचा मोठा भाग असतो.”
Binance चे ८-स्तरीय खाते संरक्षण (Account Protection)
Binance प्लॅटफॉर्मवर (Platform) क्रिप्टोचा (Crypto) अनुभव सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी रिअल-टाइम जोखीम शोध यंत्रणेवर (Real-time Risk Detection System) आधारित आठ-स्तरीय संरक्षणाचा वापर करते.
१. मल्टी-चॅनल नोटिफिकेशन्स (Multi-channel Notifications): संशयास्पद हालचाली आढळतात, तेव्हा Binance वापरकर्त्यांना ईमेल (Email) आणि इन-अॅप मेसेज (In-app Message) द्वारे सतर्क करते.
२. ओटीपी पडताळणी (OTP Verification): संवेदनशील कृतींसाठी एक युनिक (Unique), ठराविक मुदतीचा वन-टाइम पासवर्ड (One-time Password – OTP) आवश्यक असतो, त्यामुळे केवळ लॉगइन तपशीलांच्या (Login Credentials) आधारे अटॅकरला (Attacker) पुढील कारवाई करता येत नाही.
३. रोमिंग पडताळणी (Roaming Verification): नवीन डिव्हाइस (Device), ठिकाण किंवा असामान्य आयपी अॅड्रेस (IP Address) वरून केलेले लॉगइन (Login) किंवा कृती अतिरिक्त पडताळणी सुरू करतात.
४. पासकी प्रमाणीकरण (Passkey Authentication – FIDO): Binance पासकीज (Passkeys) चे समर्थन करते, जी एक डिव्हाइस-बाउंड क्रिप्टोग्राफिक लॉगइन पद्धत (Device-bound Cryptographic Login Method) आहे. ही फेस आयडी (Face ID) किंवा टच आयडी (Touch ID) द्वारे कार्य करते आणि फिशिंग (Phishing) व पासवर्ड चोरीपासून अत्यंत सुरक्षित आहे.
५. फेशियल रेकग्निशन (Facial Recognition): अधिक जोखमीच्या कृतींसाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) अनिवार्य आहे.
६. सक्तीचे लॉगआउट (Forced Logouts): खाते हॅक (Hack) झाल्याचा संशय आल्यास, Binance सर्व डिव्हाइसेसवरील (Devices) सक्रिय सेशन्स (Sessions) जबरदस्तीने लॉगआउट (Logout) करू शकते. यामुळे वापरकर्ते त्यांचा पासवर्ड (Password) रीसेट (Reset) करून खाते सुरक्षित करू शकतील.
७. एका विड्रॉलचा नकार (Single Withdrawal Rejection): एखादे संशयास्पद विड्रॉल (Withdrawal) स्वतंत्रपणे ब्लॉक (Block) केले जाऊ शकते. वापरकर्त्यांना याची सूचना दिली जाते आणि ती कृती त्यांचीच असल्यास ते अतिरिक्त पडताळणीनंतर पुन्हा प्रयत्न करू शकतात.
८. विड्रॉल कार्य थांबवणे (Withdrawal Suspension): सर्वोच्च जोखमीच्या पातळीवर शेवटची सुरक्षा उपाययोजना म्हणून पैसे काढणे (Withdrawal) तात्पुरते थांबवले जाऊ शकते. सुरक्षा तपासणी आणि खातेदाराच्या खात्रीनंतरच विड्रॉल (Withdrawal) पुन्हा सुरू केले जाते.
हा बहुस्तरीय दृष्टिकोन खात्री देतो की, वैध वापरकर्त्यांना सुरळीत व्यवहारांचा अनुभव मिळतो, तर संभाव्य जोखीम होण्याचा धोका टळतो.
१ अब्ज डॉलर्स एसएएफयू फंड (SAFU Fund): वापरकर्त्यांसाठी आपत्कालीन संरक्षण
सिक्युअर अॅसेट फंड फॉर युझर्स (Secure Asset Fund for Users – SAFU) हा आपत्कालीन राखीव निधी आहे, जो Binance ने जुलै २०१८ मध्ये स्थापन केला होता. एसएएफयू फंड (SAFU Fund) सुरक्षा उल्लंघन (Security Breach) किंवा प्लॅटफॉर्म पातळीवरील अनुचित घटनांसारख्या अत्यंत बिकट प्रसंगी वापरकर्त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी काम करतो. २०२६ पर्यंत, या फंडात (Fund) अंदाजे १ अब्ज डॉलर्स (८,४०० कोटी रुपये) आहेत.
एसएएफयू (SAFU) इतर संरक्षण उपाय अपुरे पडतात तेव्हा सुरक्षेचे जाळे (Safety Net) म्हणून काम करते आणि हा निधी कामकाजाच्या खात्यांपासून पूर्णपणे वेगळा ठेवला जातो. एखाद्या सुरक्षा समस्येमुळे वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास बाधित वापरकर्त्यांची भरपाई करण्यासाठी Binance एसएएफयूमधील (SAFU) मालमत्तेचा वापर करू शकते.
शिक्षणाच्या माध्यमातून वापरकर्त्यांचे सक्षमीकरण (User Empowerment)
Binance च्या यंत्रणा लाखो जोखीम रोखू शकतात आणि अत्यंत बिकट परिस्थितीसाठी एसएएफयू फंड्स (SAFU Funds) सज्ज आहेत. पण कोणतीही यंत्रणा वापरकर्त्यांसाठी प्रत्येक निर्णय घेऊ शकत नाही. एखाद्या लिंकवर (Link) क्लिक (Click) करायचे की नाही, व्हेरिफिकेशन कोड (Verification Code) शेअर (Share) करायचा की नाही किंवा एखाद्या व्यवहाराला मंजुरी द्यायची की नाही, हे शेवटी वापरकर्ते ठरवतात. यामुळे वापरकर्ते संरक्षणाचे शेवटचे माध्यम ठरतात. म्हणून, Binance वापरकर्त्यांना आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देण्यावर भर देते.
स्कॅम्सच्या (Scams) पद्धती झपाट्याने बदलत असल्याने Binance ची सिक्युरिटी ब्लॉग सिरीज (Security Blog Series) समोर येणाऱ्या नवीन स्कॅमच्या (Scam) क्लृप्त्या उलगडून दाखवते. याअंतर्गत २०२६ च्या सुरुवातीपासून १० सखोल विश्लेषणात्मक लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एक एकत्रित मार्गदर्शिका (Consolidated Guide) देखील आहे, ज्यामध्ये महत्त्वाचे धडे एकाच ठिकाणी दिले आहेत. अधिक संरचित पद्धत पाहिजे असलेल्यांसाठी जोखीम व्यवस्थापनावर (Risk Management) आधारित Binance चा मोफत Binance Academy कोर्स (Course) वापरकर्त्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे हे शिकवतो. तुमच्यासाठी अधिक सोयीचे ठरेल ते तुम्ही निवडू शकता. दोन्हीचा उद्देश एकच आहे: कशापासून सावध राहायचे हे समजणे.
“वापरकर्ते संरक्षणाचे शेवटचे माध्यम आहेत,” असे सेकर म्हणाले. “कोणतीही यंत्रणा तुमच्या वतीने प्रत्येक निर्णय घेऊ शकत नाही. आमचे उद्दिष्ट माहिती उपलब्ध करून देणे हे आहे, ज्यामुळे वापरकर्ते आत्मविश्वासाने विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतील.”
सुरक्षितता राखणे सर्वांची जबाबदारी (Everyone’s Responsibility)
Binance च्या यंत्रणा सातत्याने जोखमींवर लक्ष ठेवून असल्या तरी कंपनी सर्वांना सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याचे आवाहन करते. वापरकर्त्यांना पुढील गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
● आपल्या खात्यांवर उपलब्ध असलेली सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये सक्षम (Enable) करा.
● सुरक्षा शिक्षण संसाधनांच्या (Security Education Resources) माध्यमातून माहिती मिळवत राहा.
● संशयास्पद लिंक्स (Links), मेसेजेस (Messages) आणि विनंत्यांबाबत सावध राहा.
● व्हेरिफिकेशन कोड (Verification Code) किंवा पासवर्ड (Password) कधीही कोणाशीही शेअर (Share) करू नका.
भारतात आणि जागतिक पातळीवर क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) प्रसार वेगाने वाढत असताना Binance चा २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील सुरक्षा डेटा निदर्शनास आणतो की, प्रगत तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणात आर्थिक राखीव निधी आणि वापरकर्ता शिक्षण एकत्रितपणे अधिक सुरक्षित डिजिटल अॅसेट परिसंस्था (Digita
l Asset Ecosystem) तयार करू शकतात.


