Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा - उपमहापौर परशुराम वाडेकर...

भाजपा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे आवाहन*

 

 

पुणे  : पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून *मा. कौस्तुभ मुरलीधर गावडे हे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार असून, या दोन्ही उमेदवारांना पसंतीचे प्रथम क्रमांकाचे मत देऊन प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले.

 

आज शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार्टी कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

ते म्हणाले, “महायुतीचे हे दोन्ही उमेदवार अत्यंत सक्षम आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी, दारोदारी पोहोचून प्रचार करावा. पसंतीचे एक नंबरचे मत पदवीधर मतदार संघातुन डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदार संघातून मा. कौस्तुभ गावडे एक नंबरचे पसंतीचे मत देऊन यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. येत्या २३ तारखेला महायुतीचा विजय नक्की होणार आहे.”

 

यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नेते *रामदासजी आठवले साहेब* यांच्या आदेशानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

 

या बैठकीला राज्याचे माजी सचिव बाळासाहेब जानराव, मा. निलेश अल्हाट, नगरसेवक मोहन जगताप, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, किस्टपल राजमनी, अविनाश कदम, विनोद टोपे, संतोष खरात, विरेन साठे, सुनील गवळी, निलेश रोकडे, दामोदरे, खराळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते   श्याम सदाफुले यांनी आभार प्रदर्शन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments