Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही - कामगारनेते यशवंतभाऊ...

देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 

 

 

पिंपरी(प्रतिनिधी) दिनांक १८ ऑक्टोबर २०२६:- आंदोलन करणे, सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करताना देशाची प्रतिष्ठा आणि घटनात्मक पदांचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी मांडली. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

पत्रकार परिषदेला नंदू आप्पा कदम ,महेंद्र बाविस्कर, मंगेश धाडगे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

 

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून आपण मुंबईसह विविध ठिकाणी सामाजिक आणि कामगार चळवळीत सक्रिय असून अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहोत. आंदोलन करताना सरकारच्या धोरणांवर टीका करणे, प्रश्न उपस्थित करणे आणि चर्चेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणे योग्य आहे. मात्र, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींवर वैयक्तिक पातळीवर अर्वाच्य भाषेत टीका करणे योग्य नाही.

 

युट्यूबर ध्रुव राठी यांनी आंदोलनात सहभागी होऊन देशाच्या पंतप्रधानावर टिका करणे व देशाची गरिमा जगपातळीवर खराब करणे देशविरोधी आहे.ज्या इंग्रजांनी भारत देशावर दिडशे वर्ष राज्य केले संपूर्ण देश लुटून नेला . त्या पारतंत्र्यातून देश मुक्त व्हावा यासाठी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल,महात्मा गांधी, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू यांनी देशासाठी बलिदान दिले व इंग्रजांना हुसकावून लावले. त्याच ब्रिटिशांच्या इंग्लाड मध्ये जाऊन भारताचा नागरिक देशाविरुद्ध व देशाच्या पंतप्रधानां विरुद्ध आंदोलन उभे करतो. अपशाद्ब वापरून अवहेलना करतो हा देशद्रोह असून भारत देशातील देशप्रेमी जनता कदापी सहन करणार नाही.

 

कोरोना महामारीचा काळ आणि आखाती युद्धाच्या कालावधी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी या करता बहुमोलाचे कार्य केले व त्यामुळेच जागतिक स्तरावर भारत देशाचा नावलौकिक हा क्रमांक १ वर गेला हे विसरून चालणार नाही. आज जंतर मंतरच्या घडामोडीमुळे या सर्व देशाला मिळालेल्या बहुमानाला तडा घालवण्याचे काम हे निंदनीय आहे.

 

श्री ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती २०२५ मध्ये झालेली आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीच्या निवडणुकीवर आक्षेप घेतल्यामुळे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन SIR याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतलेला आहे. त्यामध्ये जे या देशाचे खरे नागरिक आहेत व त्यांनाच या देशाचे सर्व योजनांचे फायदे त्याचप्रमाणे नोकरीमध्ये संधी उपलब्ध व्हावी या करता देखील या कार्यक्रमाचा उपयोग महत्वपूर्ण ठरत आहे. अनेक विदेशी नागरिक उदा. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशातील नागरिक भारतात येऊन नागरिकत्व मिळवतात व सगळे फायदे घेतात व या देशातील खऱ्या अल्पसंख्यांकावर अन्याय करतात. त्यामुळे हा कार्यक्रम सुरू असून त्याचे पुढील चार टप्पे बाकी आहेत. त्यामुळे भारताच्या कोणत्याही सच्चा नागरिकांवर अन्याय होणार नाही याची मला भारतीय नागरिक म्हणून खात्री आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments