Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप मध्ये स्पेनच्या युजेनिओ चॅकारा याला विजेतेपद 

डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप मध्ये स्पेनच्या युजेनिओ चॅकारा याला विजेतेपद 

 

 

डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप जागतिक क्रमवारीतही अग्रमानांकनाकडे झेप

 

पुणे, १८ ऑक्टोबर २०२६: स्पेनच्या युजेनिओ चॅकाराने तिसऱ्या फेरीत मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखताना डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप मध्ये विजेतेपदाचा बहुमान मिळवला. डीपी वर्ल्ड स्पर्धा मालिकेतील २०२६ या मौसमातील त्याचे हे तिसरे विजेतेपद ठरले. इतकेच नव्हे तर डीपी वर्ल्ड यांनी जाहीर केलेल्या दुबई वर्ल्ड जागतिक क्रमवारीत त्याने अग्र स्थानाकडे झेप घेतली.

 

केवळ आबुदाबी व दुबई येथे केवळ दोनच स्पर्धा बाकी असताना या मौसमाअखेर जाहीर होणाऱ्या मानांकनासाठीच्या शर्यतीत चॅकाराने पॅट्रिक रीड आणि रोरी मॅकएलरॉय या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली आहे.

 

दिल्ली गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या या स्पर्धेत ४० लाख डॉलर्स पारितोषिकाची रकमेतील अखेरचा दिवस सर्वच खेळाडूंसाठी व्यस्त ठरला. चॅकाराने हि तिसऱ्या फेरीतील राहिलेली ७ होल पूर्ण करताना ३ बर्डीज आणि एका इगल सह ५ अंडर अशी कामगिरी बजावली. चॅकाराची चारही फेऱ्यांमधील कामगिरी ६७-६७-६३-७०- अशी होती. यामुळे त्याने टॉमी फ्लिटवूड याची सर्वोत्तम कामगिरी एका फटक्याच्या सरस अंतराने एकूण २१ अंडर अशा गुणांनी मागे टाकली. त्याने एकूण २४ बर्डी आणि १ इगल सह ५ बोगी ही केल्या.

 

या स्पर्धेला नवा विजेता मिळत असतानाच स्मार्ट लॉजिटिक्स क्षेत्रातील जगातील अग्रगण्य उद्योग संस्था डीपी वर्ल्ड यांनी २०३५ पर्यंत या स्पर्धेला प्रायोजकत्व देण्याचे जाहीर केल्यामुळे भारतीय गोल्फ क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. त्यामुळे २०३५ पर्यंत ही स्पर्धा डीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप या नावाने ओळखली जाईल.

 

दरम्यान आज संपलेल्या स्पर्धेत चॅकारा पाठोपाठ न्यूझीलंडच्या डॅनियल हीलियर याने १९ अंडर अशा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. त्याने ९व्या होल नंतर दोन फटक्याची आघाडी घेत चॅकाराला धक्का दिला होता. परंतु चॅकाराने अखेरपर्यंत कडवी झुंज देत विजेतेपद पटकावले. चॅकाराने अखेरच्या फेरीत ५ फटक्यांची आघाडी कायम राखताना एकही बोगीची नोंद न करता ६३ गुणांची नोंद केली. हि कामगिरी करताना त्याला पायाच्या अंगठ्याला झालेल्या गंभीर दुखापतीवरही मात केली.

 

चॅकारा म्हणाला की, चार फेऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि गेल्या काही आठवड्यांच्या कडव्या झुंझीनतर मिळवलेले हे विजेतेपद माझ्यासाठी मोलाचे आहे. मी योग्यवेळी खरोखरीच चांगला खेळ करू शकलो याचे मला समाधान वाटते. फ्रांस व स्पेन येथे झालेल्या गेल्या दोन स्पर्धांमध्ये मला तिसऱ्या व दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेतही चौथी फेरी खूपच अवघड होती. स्पर्धेच्या चारही दिवशी पहाटे ४ वाजता उठून कोर्सवर उतरावे लागल्यामुळे माझे शरीरही पूर्णपणे साथ देत नव्हते. तरीही हा विजय मिळवता आल्याचा मला आनंद वाटतो.

 

पुढच्या वर्षी होणारी रायडर कप या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील संभाव्य कामगिरी बद्दल बोलताना चॅकारा म्हणाला की, मी या स्पर्धेसाठी संघात असलो पाहिजे अशी माझी इच्छा आहे. युरोपियन कर्णधार ल्युक डोनाल्ड यालाही मी तसे सांगितले आहे. परंतु त्या संघात स्थान मिळवणे खरोखरीच आव्हानात्मक आहे. मी त्यासाठी अतिशय कठोर परिश्रम करत असून त्याबाबत कमालीचा आशावादी आहे.

 

डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपसाठी डीपी वर्ल्ड हे मुख्य प्रायोजक असून हिरो फिनकॉर्प, एएम ग्रीन आणि ब्लूम बर्ग हे प्लॅटिनम प्रायोजक आहेत. याशिवाय एडब्ल्यूएस, जीएमआर एरो आणि एचएसबीसी हे प्रीमियर प्रायोजक, तर अल्डर, एचसीएल टेक, ओमेगा, कोहलर आणि एमिरेट्स हे अधिकृत भागीदार आहेत. बिसलेरी, मेदांता, द ओबेरॉय, निकोबार, हाऊस ऑफ ग्लेनफ़िडीच, टेलरमेड इंडिया व पोकारी स्वीट्स हे स्पर्धेसाठी अधिकृत पु

रवठावदार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments