गुरुग्राम | ऑक्टोबर २१, २०२६: ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आपल्या आगामी इंटेलिजंट युटिलिटी वेईकलच्या लाँचपूर्वी आज ह्युंडाई बेयॉनची सुरक्षितता वैशिष्ट्ये जाहीर केली.
ग्लोबल के एनहान्स्ड प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेली ह्युंडाई बेयॉन ५-स्टार भारतीय सुरक्षितता निकषांनुसार इंजिनिअर करण्यात आली आहे. प्रबळत बॉडी रचना, हाय-स्ट्रेंथ स्टील तंत्रज्ञान, ह्युंडाई स्मार्टसेन्स लेव्हल २ प्रो एडीएएस – हायवे ड्रायव्हिंग इंटेलिजन्स आणि प्रगत व प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्यांची विस्तृत श्रेणी असलेल्या ह्युंडाई बेयॉनमध्ये प्रवाशांना सुरक्षिततेचा आश्वासक अनुभव देण्यासाठी पॅसिव्ह प्रोटेक्शन, अॅक्टिव्ह सेफ्टी आणि इंटेलिजंट ड्रायव्हर असिस्टन्स आहे.
ह्युंडाई बेयॉनच्या सुरक्षितता तंत्रज्ञानाबाबत मत व्यक्त करत ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. तरुण गर्ग म्हणाले, “ह्युंडाईमध्ये आमचा विश्वास आहे की, खरी नाविन्यता ग्राहकांचे दैनंदिन अनुभव अधिक समृद्ध करते तेव्हाच अर्थपूर्ण ठरते. ह्युंडाई बेयॉनसह आम्ही सर्वसमावेशक सुरक्षिततेचा अनुभव देण्यासाठी प्रबळ बॉडी रचना, प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञान आणि इंटेलिजंट ड्रायव्हर असिस्टन्स यंत्रणेची सांगड घातली आहे. या वेईकलचे प्रबळ चेसिस आणि हाय-स्ट्रेंथ स्टील रचनेपासून ते ह्युंडाई स्मार्टसेन्स लेव्हल २ प्रो एडीएएस पर्यंत बेयॉन केवळ आव्हानात्मक परिस्थितीत नाही, तर प्रत्येक प्रवासात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी इंजिनिअर करण्यात आली आहे. यामधून भारतातील आधुनिक व्यक्तींसाठी सुरक्षित, कनेक्टेड आणि पुरोगामी असणारे इंटेलिजंट मोबिलिटी सोल्युशन्स देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
ह्युंडाई बेयॉनमध्ये कोणती सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत?
ह्युंडाई बेयॉनच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये ८० हून अधिक प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि ३५ हून अधिक प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे प्रवाशांना सर्वसमावेशक सुरक्षितता परिसंस्थेची खात्री मिळते.
या सेफ्टी पॅकेजमध्ये ह्युंडाई स्मार्टसेन्स लेव्हल २ प्रो एडीएएस, प्रबळ चेसिस, हाय-स्ट्रेंथ स्टील रचना, प्रमाणित सहा एअरबॅग्ज, सराउंड व्ह्यू मॉनिटर, ब्लाइंड-स्पॉट व्ह्यू मॉनिटर, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स यांसारख्या इतर तंत्रज्ञानांचा समावेश आहे.
टक्करच्या (कोलिजन) वेळी ह्युंडाई बेयॉन प्रवाशांचे संरक्षण कसे करते?
ह्युंडाई बेयॉन ग्लोबल के एनहान्स्ड प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आली आहे, जी प्रबळ चेसिस आणि विविध ग्रेड्सच्या हाय-स्ट्रेंथ स्टीलच्या सुनियोजित वापराने इंजिनिअर केली आहे.
टक्करच्या वेळी निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांचे अधिक संरक्षण करण्यासाठी या वेईकलची प्रगत बॉडी रचना डिझाइन करण्यात आली आहे. फ्रंट अॅप्रन, डॅशबोर्ड, रिअर फ्लोअर आणि बाजूच्या बळकटीकरणासह अत्यंत महत्त्वाच्या भागांमध्ये हॉट-स्टॅम्प केलेले घटक योजनाबद्धरीत्या वापरले गेले आहेत. हॉट-स्टॅम्प केलेले रिअर-फ्लोअर साईड मेंबर्स मागून होणाऱ्या धडकेपासून अधिक संरक्षण देतात, तर ड्युअल-बॉक्स रचना, मल्टिपल लोड पाथ्स आणि रिंग-टाईप रचना टक्करची ऊर्जा शोषून घेण्यास व तिचे योग्य वितरण करण्यास रचनेची अखंडता अधिक मजबूत करण्यास आणि वेईकलच्या केबिनमध्ये आघात होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात.
मूलभूत पातळीवर, ह्युंडाई बेयॉनची सुपर-स्ट्रॉन्ग बॉडी स्ट्रक्चर उत्कृष्ट स्ट्रक्चरल रिजिडिटीसाठी हॉट स्टॅम्पिंग (एचएस), अल्ट्रा हाय स्ट्रेंथ स्टील (यूएचएसएस), अॅडव्हान्स्ड हाय स्ट्रेंथ स्टील (एएचएसएस) आणि हाय स्ट्रेंथ स्टील (एचएसएस) एकत्र करून ६९ टक्के अॅडव्हान्स्ड मल्टी-ग्रेड हाय-स्ट्रेंथ स्टीलसह इंजिनिअर केली गेली आहे. हे प्रगत घटक मिळून प्रबळ आणि लवचिक बॉडी रचना तयार करतात, जी ५-स्टार भारतीय सुरक्षितता निकषांनुसार इंजिनिअर करण्यात आली आहे, तसेच प्रवाशांना उच्च पातळीचे संरक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
ह्युंडाई बेयॉन ५-स्टार भारतीय सुरक्षितता निकषांनुसार कशाप्रकारे इंजीनिअर करण्यात आली आहे?
ह्युंडाई बेयॉनमधील सुरक्षिततेची सुरुवात तिच्या मूळ प्लॅटफॉर्म आणि बॉडी रचनेपासून होते. ग्लोबल के एनहान्स्ड प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेली बेयॉन ही ५-स्टार भारतीय सुरक्षितता निकषांनुसार इंजिनिअर करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म बेयॉनच्या सर्वसमावेशक सुरक्षितता रचनेचा (सेफ्टी आर्किटेक्चर) पाया तयार करतो आणि वेईकलच्या प्रबळ स्ट्रक्चरल डिझाइनला पाठबळ देतो.
एकत्रित, प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर आणि बॉडी रचनेमधून केवळ वैयक्तिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता विकासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून वेईकलमध्ये सुरक्षितता समाविष्ट करण्याचा, तसेच सर्वांगीण सुरक्षितता परिसंस्थेचा पाया रचण्याचा ह्युंडाईचा दृष्टिकोन निदर्शनास येतो.
ह्युंडाई स्मार्टसेन्स लेव्हल २ प्रो एडीएएस सुरक्षित ड्रायव्हिंगला कशी मदत करते?
ह्युंडाई बेयॉनमध्ये २३ ह्युंडाई स्मार्टसेन्स लेव्हल २ प्रो एडीएएस तंत्रज्ञानांचा सर्वसमावेशक संच आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
· फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (एफसीडब्ल्यू)
· फॉरवर्ड कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट – कार (एफसीए)
· फॉरवर्ड कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट – पेडेस्ट्रियन (एफसीए-पेड)
· फॉरवर्ड कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट – सायकल (एफसीए-सायकल)
· फॉरवर्ड कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट – जंक्शन टर्निंग (एफसीए-जेटी)
· फॉरवर्ड कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट – डायरेक्ट ऑनकमिंग (एफसीए-डीओ)
· ब्लाइंड-स्पॉट कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट (बीसीए)
· लेन किपिंग असिस्ट (एलकेए)
· लेन डिपार्चर वॉर्निंग (एलडीडब्ल्यू)
· ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग (डीएडब्ल्यू)
· सेफ एक्झिट वॉर्निंग (एसईडब्ल्यू)
· ब्लाइंड-स्पॉट कोलिजन वॉर्निंग (बीसीडब्ल्यू)
· रिअर क्रॉस-ट्रॅफिक कोलिजन वॉर्निंग (आरसीसीडब्ल्यू)
·
· रिअर क्रॉस-ट्रॅफिक कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट (आरसीएए)
· सराउंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम)
· ब्लाइंड-स्पॉट व्ह्यू मॉनिटर (बीव्हीएम)
· स्मार्ट क्रूझ कंट्रोल विथ स्टॉप अँड गो (एससीसी विथ एसअँडजी)
· लेन फॉलोइंग असिस्ट (एलएफए)
· हाय बीम असिस्ट (एचबीए)
· लीडिंग वेईकल डिपार्चर अलर्ट (एलव्हीडीए)
· नॅव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट क्रूझ कंट्रोल झोन (एनएससीसी-झेड)*
· नॅव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट क्रूझ कंट्रोल कर्व्ह (एनएससीसी-सी)*
· हायवे ड्रायव्हिंग असिस्ट (एचडीए)
एकत्रितपणे, ही तंत्रज्ञाने एक्सप्रेसवे, महामार्ग, शहरातील रस्ते, जंक्शन्स, पार्किंगची ठिकाणे आणि दैनंदिन ट्रॅफिकच्या परिस्थितीत इंटेलिजंट साहाय्य देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
ह्युंडाई बेयॉनमध्ये कोणती प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत?
ह्युंडाई बेयॉनच्या सर्व ट्रिम्समध्ये प्रमाणित म्हणून ३५ हून अधिक सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे वेईकलच्या सुरक्षिततेचा पाया म्हणून या संपूर्ण श्रेणीमध्ये आवश्यक सुरक्षितता तंत्रज्ञान उपलब्ध असल्याची खात्री मिळते.
यामध्ये खालील प्रमाणित वैशिष्ट्यांचा समावेश आहे:
· रोल ओव्हर सेन्सर
· टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (टीपीएमएस) – हाय
· ६ एअरबॅग्ज
· हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी)
· इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस)
· बर्गलर अलार्म · हेडलॅम्प एस्कॉर्ट फंक्शन
· इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)
· ३ पॉईंट सीटबेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर
· सेंट्रल लॉकिंग
· आयएसओफिक्स (ISOFIX)
· रिअर पार्किंग सेन्सर्स
ह्युंडाई बेयॉन सुरक्षितता आणि इंटेलिजंट मोबिलिटी एकत्र कशी आणते?
इंटेलिजंट युटिलिटी वेईकल म्हणून ह्युंडाई बेयॉन एकाच एकात्मिक परिसंस्थेमध्ये प्रबळ इंजिनिअरिंग, इंटेलिजंट ड्रायव्हर असिस्टन्स तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक सुरक्षितता पॅकेज एकत्र आणते. या वेईकलच्या केंद्रस्थानी ह्युंडाई स्मार्टसेन्स लेव्हल २ प्रो एडीएस – हायवे ड्रायव्हिंग इंटेलिजन्स आहे, ज्यामध्ये २३ प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स फंक्शन्स, ३ रडार्स आणि १२ पार्किंग सेन्सर्स समाविष्ट आहेत, जे ड्रायव्हर सतर्कता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकत्र काम करतात.
ह्युंडाई बेयॉनमध्ये अरुंद जागांमध्ये वेईकल चालवताना अधिक सतर्कता प्रदान करण्यासाठी इंटेलिजंट कॅमेरा आणि सेन्सिंग तंत्रज्ञान आहे. सराउंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम) वेईकलभोवती सर्वसमावेशक दृश्य दाखवतो, तर ब्लाइंड-स्पॉट व्ह्यू मॉनिटर (बीव्हीएम) अशा जागा प्रदर्शित करतो ज्या पारंपरिक आरशांमधून पाहणे कठीण असू शकते. या वेईकलमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर्सची सुविधाही आहे, तर रिअर क्रॉस-ट्रॅफिक कोलिजन वॉर्निंग आणि रिअर क्रॉस-ट्रॅफिक कोलिजन-अॅव्हॉइडन्स असिस्ट वेईकल रिव्हर्स करताना अतिरिक्त साहाय्य देतात. एक्सप्रेसवे आणि महामार्गांवर अधिक आराम, सोईस्करपणा आणि ड्रायव्हिंग सपोर्टसाठी ह्युंडाई बेयॉन एडीएएस लेव्हल २ प्रो स्मार्ट क्रूझ कंट्रोल विथ स्टॉप अँड गो (एससीसी विथ एसअँडजी) आणि लेन फॉलोइंग असिस्ट (एलएफए) व्यतिरिक्त नॅव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट क्रूझ कंट्रोल कर्व्ह अँड झोन (एनएससीसी-सी आणि एनएससीसी-झेड)* आणि हायवे ड्रायव्हिंग असिस्ट (एचडीए) समाविष्ट करून प्रगत व इंटेलिजंट हायवे ड्रायव्हिंग अनुभव देते. बेयॉनमध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग (एलडीडब्ल्यू) आणि लेन किपिंग असिस्ट (एलकेए) ही वैशिष्ट्ये देखील आहेत. वेईकल नकळत लेन सोडत असल्याचे आढळले, तर एलडीडब्ल्यू ड्रायव्हरला सतर्क करतो, तर लागू असलेल्या परिस्थितीत वेईकल तिच्या लेनमध्ये ठेवण्यास मदत करण्यासाठी एलकेए स्टिअरिंग साहाय्य देऊ शकतो. सेफ एक्झिट वॉर्निंग (एसईडब्ल्यू) सिस्टीम दरवाजा उघडत असताना मागून वेईकल येत असल्याचे आढळल्यास प्रवाशांना सतर्क करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. हे वैशिष्ट्य वेईकल थांबलेली असताना, विशेषतः गर्दीच्या शहरी भागात सतर्कतेचा अतिरिक्त स्तर प्रदान करते.
ह्युंडाई बेयॉन भारतातील आधुनिक ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबांच्या बदलत्या गरजांनुसार डिझाइन केलेली इंटेलिजंट युटिलिटी वेईकल उपलब्ध करून देते, तसेच इंटेलिजंट मोबिलिटीसह सर्वसमावेशक सुरक्षितता एकत्र आणण्याच्या ह्युंडाईच्या कटिबद्धतेला सादर करते.
ह्युंडाई बेयॉनमध्ये कोणते रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत?
ह्युंडाई बेयॉन व्हायब्रंट, प्रीमियम आणि आकर्षक रंगांचे विचारपूर्वक निवडलेले पर्याय उपलब्ध करून देते, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि जीवनशैलीला साजेसा रंग निवडू शकतात. ही इंटेलिजंट एसयूव्ही मोनोटोन, मॅट आणि ड्युअल-टोन अशा १० एक्सटीरियर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये खालील रंगांचा समावेश आहे:
श्रेणी
उपलब्ध रंग
मोनोटोन रंग
टायटॅनियम ब्लॅक, क्लासी ब्लू, अॅटलास व्हाईट, फायरी रेड, गोल्डन ब्रॉन्झ, इकोट्रॉनिक ग्रे
ड्युअल-टोन रंग
ब्लॅक रूफसह अॅटलास व्हाईट, ब्लॅक रूफसह फायरी रेड
मॅट रंग
टायटॅनियम ब्लॅक मॅट, क्लासी ब्लू मॅट
भारतात ह्युंडाई बेयॉन कधी लाँच होणार आहे?
ह्युंडाई बेयॉन भारतात २६ ऑक्टोबर २०२६ रोजी लाँच केली जाईल.
मी ह्युंडाई बेयॉन कशी बुक करू शकेन?
ग्राहक ह्युंडाईच्या अधिकृत वेबसाइटवरून (hyundai.co.in) ऑनलाइन किंवा कोणत्याही अधिकृत ह्युंडाई डीलरशिपवर ११,००० रुपये बुकिंग रक्कम भरून ह्युंडाई बेयॉन बुक करू शकतात.
या फेस्टिव्ह हंगामात सादर होत असलेल्या ह्युंडाई बेयॉनच्या डिलिव्हरीची वेळ (टाइमलाइन) लाँचच्या वेळी कळवली जाईल.


